News & View

ताज्या घडामोडी

images 33

कलाकेंद्र चालवणाऱ्या रत्नाकर शिंदेंची हकालपट्टी !

बीड-अवघ्या दीड दोन महिन्यांपूर्वी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त झालेल्या उद्धव ठाकरे गटाचे रत्नाकर शिंदे यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे.शिंदे यांच्यावर कलाकेंद्र चालवत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या शिफारशी वरून शिंदे यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती.

केज शहरातील एका कला केंद्रावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घालून काही अल्पवयीन मुली महिला आणि ग्राहकांना अटक केली होती या कला केंद्रात गुटखा दारू सिगरेट आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले जात असल्याचे उघड झाले याप्रकरणी उपस्थित ग्राहक महिला मुली यांच्यासोबतच कला केंद्र चालक आणि मालक रत्नाकर शिंदे यांच्याविरुद्ध देखील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

images 327754429213688813479

रत्नाकर शिंदे हे दीड महिन्यापूर्वीच उद्धव ठाकरे गटाच्या बीड जिल्हा प्रमुख पदी नियुक्त झाले होते यापूर्वीचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्याकडून वारंवार लाखो रुपयांची मागणी होत असल्याचे सांगत त्यांना मारहाण केली होती त्यामुळे जाधव यांची पक्षाने हकालपट्टी करत अंधारे यांच्या शिफारशीवरून रत्नाकर शिंदे यांची नियुक्ती केली होती मात्र कला केंद्र चालवून मुलींचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने आता त्यांचीही हकालपट्टी करण्याची वेळ उद्धव ठाकरे गटावर आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *