News & View

ताज्या घडामोडी

file 00000000ccd071faaf8b4fc1d64fdb7b

लाचखोर अधिकाऱ्यास अटक!

बीड – येथील शासकीय निरीक्षण गृहाचा प्रभारी अधीक्षक कपिल कांबळे यास तीस हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा हजेरी अहवाल सुरळीतपणे वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी आणि संबंधित आदेश काढण्यासाठी कपिल कांबळे याने 45 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 30 हजार रुपये देण्याचे ठरले.

याप्रकरणी रविवारी तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जालना एसीबीच्या पथकाने सोमवारी पालवण चौक परिसरात सापळा रचला. यावेळी लाचेची 30 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना कांबळे याला रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान घरझडतीसाठी बीड एसीबीचे एक पथक रवाना केले असून पुढील कारवाई सुरु आहे. सातत्याने होत असलेल्या लाचखोरीच्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version