बीड -तालुक्यातील हिवरापहाडी येथील प्रकरणात ग्रामसेवकांच्या तक्रारीवरून सदर विवाहितेच्या आई वडिलांसह पाच जनावर गुन्हा दाखल झाला आहे.
बीड तालुक्यातील हिवरापहाडी येथील एका विवाहितेवर अत्याचार करून चावडीवरील एका खांबाला बांधून ठेवण्यात आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. महिला आयोगाने या प्रकरणाची दाखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
या विवाहितेचे चौदा पंधरा वर्षाची असताना लग्न करण्यात आले होते. त्यामुळे बाल हक्क संरक्षण समितीने या प्रकरणी बाल विवाहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
ग्रामसेवक यांच्या तक्रारीवरून सदर विवाहितेच्या आई वडील व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





Leave a Reply Cancel reply