News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण पापमोचनी एकादशी / जागतिक ग्राहक दिन
🌸 नक्षत्र…. श्रवण
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. १५ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. सायं. ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/४९ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक १५ मार्च २०२६‼️

मेष:- चंद्र नवमस्थानी आहे. आध्यत्मिक उन्नतीसाठी चांगला कालावधी आहे. प्रवास घडेल. सकारात्मकता व आत्मविश्वासाने कार्यसिध्दि होईल.

वृषभ:- हितशत्रुंपासून मनाविरुध्द गोष्ट घडेल. खूप मनावर घेऊ नका. आर्थिक कामे होतील. अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शेअजाऱ्यांशी वाद संभवतात.

मिथुन:- मन आनंदी राहील. नविन खरेदी होण्याचे योग आहेत. भौतिक सुखाची ओढ वाटेल. कामामध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे नाराज न होता पुढील प्लॅन करण्यासाठी याचा उपयोग करा. पित्याशी मतभेद संभवतात.

कर्क:- आर्थिक लाभ वाढतील. भागिदार वरिष्ठ यांपासून सहकार्य मिळेल तरीही महत्वाच्या कामामध्ये विशेष दक्षता बाळगावी. आरोग्य सांभाळावे. मनासारखा खर्च कराल. आनंदी उत्सवात सहभागी व्हाल.

सिंह:- आपले नायोजन चांगले असेल योग्य प्रतिसाद मिळाल्यास तुमचे अंदाज अचूक ठरतील. कामाची गोडी लागेल. नविन कल्पना सुचतील. प्रतिष्ठा तुमच्यासाठी फार महत्वाची असते. मात्र आज तडजोड करावी लागेल.

कन्या:- कौटुंबिक कामामधून काहीसा आराम देणारा दिवस आहे. आनंद देणाऱ्या बातम्या समजतील. सरकारी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठांशी संबंध सुधारतील.

तुळ:- आध्यत्मिक लाभ होतील. उत्साहाने आनंदाने कार्य कराल. कामाचा ताण आज वाढणार आहे. तुमचे वरिष्ठ आज तुमच्यावर खूष राहू शकतात.

वृश्चिक:- नविन खरेदी होईल. कौटुंबिक वातावरण सौहार्दतेचे असेल. काही कामामध्ये मतभेद संभवतात. आर्थिक लाभ होतील. नियोजित कार्यपूर्ती होईल.

धनु:- आध्यात्मिक उपासना घडेल. आज तूमच्याच राशीत चंद्र आहे. मन प्रसन्न राहील कुलदेवतेची कृपा राहील. मात्र अपेक्षित लाभ मिळणार नाहीत. प्रिय व्यक्तीची नाराजी सहन करावी लागेल. एखाद्या ठिकाणी द्वेषाचा सामना करावा लागू शकतो.

मकर:- सहकार्‍यांकडून आज फारशी अपेक्षा ठेवू नका. विनाकारण खर्च वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. सरकारी यंत्रणेशी उगाचच वाद घालू नका. त्यात तुमचेच नुकसान होणार आहे. इतर कामे मार्गी लागतील.

कुंभ:- काही उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. दुसर्‍यांवर विश्वासून कार्य करू नका. व्यावसायिक अंदाज चुकू शकतात. प्रिय व्यक्तीकडून अपेक्षभंग होईल. आर्थिक कामे होतील.

मीन:- संयम ठेवावा लागेल. कौटुंबिक वातावरणात मधूरता येईल. घर, वाहन यांच्यावर खर्च होऊ शकतो. अहंकार बाजूला ठेवून आज काम करावे लागेल. प्रवास घडतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *