सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण दशमी
🌸 नक्षत्र…. उ. षाढा
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. १४ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/४९ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक १४ मार्च २०२६‼️
मेष: नियोजित कामामध्ये प्रगती साधेल चांगला लाभ होऊ शकतो. कामात गती येईल. मित्रत्वाचे संबंध अधिक दृढ होतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील.
वृषभ: नविन जबाबदारी मिळेल. आपल्या अनुभवातून कौशल्यातून कार्य साध्य होईल. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. नवे करार लाभदायक होतील.
मिथुन: सकारात्मक संवादातून कार्य साधून घ्या. धार्मिक विचार वाढतील देवदर्शन घडेल. विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा दिवस आहे.
कर्क: मनाची चंचलता असेल त्यामुळे कामात थोडा ताण तणाव वाढेल. आर्थिक लाभ होतील. नियोजित कामामध्ये यश मिळाल्याने समाधानी राहाल.
सिंह: मित्र सहकारी यांमधून भागीदारीचे काम यशस्वी होईल. नातेसंबंधात सामंजस्याचे वातावरण असेल. जबाबदारी वाढेल पण कामात नाविन्यामुळे आनंदी राहाल.
कन्या: कामाचे नियोजन करा कामामध्ये अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागेल. कामातून आर्थिक यश मिळेल. घरातील एखादी जबाबदारी पूर्ण होईल.
तुला: सन्मान प्रतिष्ठा व अंगीकृत कला कौशल्याला वाव मिळेल. सामाजिक कामांमध्ये भाग घ्याल. कौटुंबिक जीवन चांगले राहील.
वृश्चिक: आत्मविश्वास वाढेल. नियोजित कामामधून अपेक्षित लाभ होतील. मानसन्मान मिळेल. आपल्या निर्णयाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
धनु: नविन विचार व ध्येय धोरण आमलात आणण्यासाठी चांगला दिवस आहे. निर्णयक्षमता चांगली राहील त्यामुळे यश लाभेल. जवळच्या प्रवासातून कार्य साधेल.
मकर: शुभ दिवस आहे. नविन खरेदीचे योग आहेत. अनावश्यक खर्च टाळावा. मित्र स्नेही यांचेबरोबरील संबंधाने कामे होतील. नोकरीत स्थिरता राहील.
कुंभ: चांगला दिवस आहे. कामातील कौशल्य विकसित कराल. स्नेहसंबंधातून लाभ होतील. आपल्या विचारावर ठाम राहा. यश मिळेल.
मीन: मन प्रसन्न राहील. शुभ दिवस आहे. नित्यनैमित्तिक कामे मार्गी लागतील. ध्यान उपासना घडेल. आर्थिक कामे होतील.












Leave a Reply