परळी –एपत प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागून वीस हजार रुपये स्वीकारताना परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी परळी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
परळीचे तहसीलदार मुंडे यांच्याकडे एपत प्रमाणपत्र ची मागणी करण्यात आली होती. यासाठी त्यांनी मध्यस्थीमार्फत पन्नास हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.
तडजोडी नंतर वीस हजार रुपये देण्याची तयारी दाखवली गेली. मात्र लाच देण्याची मानसिकता नसल्याने फिर्यादीने विभागाकडे तक्रार केली. खात्री केल्यानंतर विभागाच्या पथकाने सापळा रचला.
परंतु सापळा लावला असल्याचे लक्षात आल्यानंतर मुंडे यांनी पैसे घेण्यासाठी नकार दिला. मात्र मागणी केल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी परळी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.












Leave a Reply