News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल तृतीया
🌸 नक्षत्र…. उ.भाद्रपदा
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. २० फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️दिनांक २० फेब्रुवारी २०२६‼️

मेष: विचारपूर्वक निर्णय घ्या. मानसिक चंचलता जाणवेल. अध्यात्मिक चिंतन उपासना लाभदायक होईल.

वृषभ: परिवारीक जीवनात
कुटुंबीयांच्या मतांचा आदर करा. वडिलधारी मंडळींकडून मार्गदर्शन मिळेल.आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.

मिथुन: चांगला दिवस आहे. चर्चेतून संवादातून भागीदारीच्या कामात यश मिळेल. आपल्या कामामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

कर्क: मतभेद होण्याची शक्यता आहे. सकारात्मक विचार वाढवा. तणावातून मुक्तीसाठी उपासना करा. धार्मिक कार्यात मन रमेल.

सिंह: अध्ययनासाठी अनुकूल दिवस आहे. शुभ बातमी मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. मनाच्या प्रसन्नतेसाठी ध्यान धारणा प्राणायाम करावा.

कन्या: नविन जबाबदाऱ्या वाढतील. कामामध्ये कुशलतेने कार्य संपादन होईल. मनःशांती मिळेल. आर्थिक कामे होतील.

तुला: कार्यसाधक भेटीगाठी होतील नियोजित कार्यामध्ये लाभ होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा. अडचणीतून मार्ग सापडेल.

वृश्चिक: स्थावर संपत्तीविषयक कामामध्ये गती मिळेल. आर्थिक लाभ होतील लाभाबरोबर खर्च वाढेल. मन प्रसन्न राहील. उपासना करावी.

धनु: आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वासपूर्वक कार्य साधल्याने चांगले यश मिळेल. नवीन विचार आकार घेतील. मानसिक उन्नती साधेल.

मकर: मनाची चंचलता असेल. जुने वाद मिटवण्यासाठी आजचा दिवस योग्य. सकारात्मक विचाराने अंतर्मनातील गोंधळ कमी होईल.

कुंभ: आपल्या कामाचे क्षेत्र व्यापक होईल. मित्रांकडून भागिदारांकडून मदत होईल. आध्यात्मिक क्षेत्रात रुची वाढेल. ध्यान प्राणायाम करा.

मीन: नियोजित कामामध्ये प्रगती होईल. वरिष्ठांचा विश्वास वाढेल. मित्रांपासून लाभ होतील. आर्थिक कामे होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *