सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण चतुर्दशी / सोमवती अमावस्या प्रारंभ सायं ०५/३३ मि.
🌸 नक्षत्र…. श्रवण
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. १६ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/१५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ ‼️
मेष
आज मनात उत्साह आणि आत्मविश्वास राहील. रखडलेली कामे पूर्ण होतील. आज करिअरमध्ये चांगली संधी मिळू शकते.घरात तुमचे महत्त्व वाढेल. एखादी चांगली बातमी मिळू शकते.
वृषभ
आज कामाचे कौतुक होइल.प्रेमात यश.
घरात आनंदाचे वातावरण राहील.तुमचा सल्ला मानला जाइल. आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. आज स्वतःच्या क्षमतांची जाणीव होईल.घसा सांभाळा.
मिथुन
आज उत्साही असाल.
कामात गती येईल पण घाई नको. आज कोणताही संवाद शांतपणे साधावा.मनमोकळा संवाद नात्यांत गोडवा आणेल. गैरसमज दूर होतील.
कर्क
आज आत्मविश्वास वाढेल.
कुटुंबासाठी वेळ द्याल. जुन्या अडचणी सुटतील. महिलांसाठी आज भावनिक समाधान देणारा दिवस.कामात यश, वरिष्ठांची दखल आणि छोट्या आर्थिक लाभाचे योग.
नवीन संधीचा विचार सुरू होईल.
सिंह
आज
आज तुम्ही जे ठरवाल ते पूर्ण करण्याची जिद्द तुमच्यात असेल.
कामाच्या ठिकाणी तुमचं म्हणणं ऐकलं जाईल.
आज स्वतःची ताकद दाखवण्याचा दिवस आहे.
नवीन प्रोजेक्ट, बढती किंवा प्रशंसेची शक्यता. आर्थिक स्थितीत सुधारणा.
घरात तुमचं महत्त्व वाढेल. निर्णयांमध्ये मान मिळेल.
कन्या
आज
आज तुमची कार्यक्षमता खूप वाढलेली जाणवेल.
जे काम इतरांना कठीण वाटते ते तुम्ही सहज पूर्ण कराल.
आज स्वतःवरचा विश्वास दृढ होण्याचा दिवस आहे.
कामात यश, प्रशंसा आणि छोट्या पण निश्चित आर्थिक लाभाचे योग.
नवीन जबाबदारी मिळू शकते.
घरात सुव्यवस्था राखण्यात यश. एखाद्या सदस्याला मदत कराल.
तुळ
आज नवीन संधी मिळू शकते. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत.
नातेसंबंधात सुधारणा होईल. प्रेमात गोडवा वाढेल. आज रोजी आनंददायक बातमी मिळू शकते.
वृश्चिक
आज
चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आज तुमच्यात विलक्षण आत्मविश्वास, आकर्षण आणि निर्णय क्षमता दिसेल.
जे काम अडले होते ते अचानक मार्गी लागेल.
आज स्वतःसाठी उभे राहण्याचा, हक्क मिळवण्याचा आणि प्रगतीचा दिवस आहे.
नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा आर्थिक लाभाची शक्यता आहे.
कोणीतरी तुमच्या कष्टाची दखल घेईल.
घरात तुमचा शब्द अंतिम ठरेल. वाद मिटवण्यात यश येईल.
धनु
आज तुम्हाला अचानक लाभाच्या संधी मिळू शकतात
विशेषतः नोकरी, व्यवसाय किंवा आर्थिक व्यवहारातून फायदा संभवतो.
आजचा दिवस आत्मविश्वास वाढणारा आणि धाडसी निर्णय घेण्याचा दिवस आहे.
कामात अडलेली गोष्ट पुढे सरकेल.
जुना अडथळा दूर होईल.
घरात तुमच्या मताला महत्त्व मिळेल.
मकर
मान-सन्मान, विश्वास आणि आर्थिक फायदा मिळेल.
आज वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. अडकलेली फाईल, काम किंवा पेमेंट पुढे सरकेल. आज पदोन्नती किंवा नवीन संधीची चाहूल लागू शकते.
घरात तुमचा सल्ला मोलाचा ठरेल. वडीलधारी व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. लक्ष्मी प्राप्तीचे योग.आर्थिक स्थैर्य वाढेल.
कुंभ
आज तुमची जबाबदारी वाढेल पण त्याचबरोबर मान-प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्यही मिळेल.
कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर विश्वास टाकतील. एखादे महत्त्वाचे काम तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते.
घरगुती बाबतीत तुम्ही आधारस्तंभ ठराल.
नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील. व्यवसायात लाभ संभवतो. आज सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
मीन
आज
मन प्रसन्न राहील. सर्जनशील कामात यश मिळेल. महिलांसाठी आज आनंदाचा दिवस.प्रवासातून लाभ होइल.
आरोग्य चांगले राहील.












Leave a Reply