बीड – सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन चे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पान संबळ आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुत्तेदारांना हाताशी धरून वार्षिक देखभाल दुरुस्ती च्या कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करत नंगानाच केला आहे विशेष बाब म्हणजे या सर्वांना आष्टी पाटोदा चे आमदार सुरेश धस यांचा आशीर्वाद असल्याने यांची हिम्मत अधिकच वाढली असल्याची चर्चा आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आष्टी येथे स्थलांतरित केल्यानंतर या कार्यालयाला कोणीच वाली राहिलेला नाही. सुरेश धस यांचे दोन-तीन पीए आणि कार्यकारी अभियंता पदाचा पदभार असलेले कृष्ण पानसंबळ यांनी अक्षरशः बोगस बिल मंजूर करण्याचा सपाटा लावला आहे.
वार्षिक देखभाल दुरुस्ती अर्थात एएमसी च्या नावाखाली पानसंबळ यांनी बोगस बिले उचलण्याचा एकमेव कार्यक्रम हाती घेतला आहे आपल्या जवळच्या लोकांच्या तसेच मुलाच्या लायसन वर पान संबळ यांनी एएमसी ची कामे मंजूर केली आहेत कागदावर काम बिलो रेट मध्ये मंजूर करायची आणि फायनल बिल काढताना मूळ इस्टिमेट रेट नुसार काढायची आणि त्यामध्ये शासनाची फसवणूक करायची असले उद्योग पाणसंबळ आणि या कार्यालयातील कर्मचारी करत आहेत.
एखाद्या शासकीय कार्यालयात जर बोगस बिले उचलण्याचा किंवा भ्रष्टाचार सुरू असल्याचा प्रकार निदर्शनास आला तर तो थांबवणे हा त्या भागातील लोकप्रतिनिधीच्या कर्तव्याचा भाग असतो मात्र या भागाचे लोकप्रतिनिधी असणारे आमदार सुरेश धस यांचे काही पीए पान संबळ यांच्या या कारणाम्याला साथ देण्याचा उद्योग करत आहेत.
बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर शाखा अभियंता पासून उप अभियंता या पदावर पदोन्नती मिळवलेले कृष्णा पान संबळ हे अगोदरच वादात सापडलेले असताना आता त्यांनी एम सी च्या कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा अपहार करत गुत्तेदार आमदार आणि स्वतःचे भले करण्याचा नवा उद्योग सुरू केला आहे यावर पालकमंत्री असणाऱ्या सुनेत्रा अजित पवार यांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे.





Leave a Reply Cancel reply