मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या जागेवर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबईवरून बारामतीकडे विमानाने निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी अपघातात निधन झाले त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. मात्र बीड आणि पुण्याचे पालकमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु राज्य सरकारने नुकत्याच एका परिपत्रकान्वये बीड आणि पुणे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोनेत्रा पवार यांच्यावर सोपवली आहे.





Leave a Reply Cancel reply