पुणे -पुण्याहून बारामती कडे जाणाऱ्या विमानाला गोजूबावी या ठिकाणी भीषण अपघात झाला. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे, दरम्यान डी जी सी ए ने सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे येथून बारामतीकडे खाजगी विमानाने निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाला लँडिंग दरम्यान अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये विमान पूर्णपणे जळून खाक झाले या विमानात स्वतः अजित पवार यांच्यासह त्यांचे बॉडीगार्ड आणि पायलट असे सहा जण होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अजित पवार यांना तातडीने ॲम्बुलन्स मधून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून खासदार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे रवाना झाल्या आहेत.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जण मृत्यूमुखी पडले असल्याचे डी जी सी ए ने कन्फर्म केले आहे.












Leave a Reply