News & View

ताज्या घडामोडी

IMG 20260106 WA0051

बीडमध्ये गोळीबार, मजुराचा निर्घृण खून!

बीड – शहरातील अंकुश नगर भागात दुपारच्या सुमारास अंदाधुंद गोळीबारात एका खून झाल्याची घटना घडली या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोपी फरार झाला आहे घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन तपासासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत. या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नगरपरिषदेत रोजंदारीवर काम करणारे कामगार हर्षद शिंदे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील अंकुश नगर परिसरात घडली. या गोळीबारात हर्षद यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे बीड  शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील अंकुश नगर परिसरात नगरपरिषदेच्या वतीने खड्डा खोदण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला. गोळी लागल्याने हर्षद शिंदे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर आरोपी विशाल सूर्यवंशी हा पळून गेल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

img 20260106 wa00495946816581776270952
आरोपी विशाल सूर्यवंशी!

परिसरात पंचनामा करण्यात आला असून मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे बीड मधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *