बीड –मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 19 डिसेंबर रोजी होणार आहे. बचाव पक्षाच्या वकिलांनी पुढील तारीख मागितल्याने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत पुढील तारीख देण्यात आली.
वर्षभरापूर्वी 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाल्मिक कराड सह इतर आरोपी अटक करण्यात आले होते.
मागील वर्षभरात जवळपास पंधरा सोळा वेळेस या प्रकरणाची सुनावणी झाली. शुक्रवारी 12 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणी वेळी बचाव पक्षाचे वकील यांनी साक्षी पुरावे सादर करण्यासाठी पुढील तारीख मागितली. त्यानुसार न्यायालयाने 19 डिसेंबर रोजी दोषारोप निश्चित करण्याबाबत निर्णय दिला.





Leave a Reply Cancel reply