News & View

ताज्या घडामोडी

IMG 20230628 WA0037

जाटनांदूर जवळ अपघात ! चार जण जागीच ठार !

डोंगरकिन्ही बीड कल्याण महामार्गावर डोंगर किनी नजीक असलेल्या जात नांदूर घोडेवाडी या ठिकाणी आयशर टेम्पो आणि स्कार्पिओ गाडी यांचा भीषण अपघात झाला यामध्ये चार जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे

जात नांदूर नजीक असलेल्या घोडेवाडी या ठिकाणी बीडहून नगर कडे निघालेला आयशर टेम्पो आणि नगरहून गेवराई कडे निघालेली स्कार्पिओ यांच्यामध्ये भीषण अपघात झाला हा अपघात एवढा गंभीर होता की यामध्ये चार जण जागीच ठार झाले असून एका महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे

img 20230628 wa00346680741480515274204

सर्व मृत हे गेवराई तालुक्यातील मारफळा या गावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *