News & View

ताज्या घडामोडी

IMG 20251012 WA0005

बायपास वरील पूल आणि स्लिप रोडच्या कामाला सुरवात!

बीडबीड शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बारा किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण रस्त्यावरील दोन उड्डाणपूल आणि स्लिप रोडच्या कामाला सुरवात झाली आहे. आ संदीप क्षीरसागर आणि माजी आ सय्यद सलीम यांनी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. रविवारी या दोघांनी अधिकाऱ्यांसह या कामाची पाहणी केली.

बीड शहरातून जात असलेल्या आणि उत्तर दक्षिण जोडणारा धुळे सोलापुर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. यात जड वाहतकीचे प्रमाण देखील जास्त असते. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बायपास रस्त्यावरील शहरात वळणावर नेहमी अपघात होत होते. यामुळे संभाव्य अपघात टळले पाहिजेत आणि नागरिकांचे जीव वाचले पाहिजेत त्यामुळे या वळणावर पुलांची बांधणी आणि स्लिप सर्विस रस्त्याची जोडणी अत्यंत महत्त्वाची होती.


त्या दोन्ही ठिकाणी पुलांची बांधणी व १२ किलोमीटर च्या रस्त्यावर स्लिप सर्व्हिस रस्ता जोडणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली. या कामासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.


बीड विधानसभेचे आ.संदीप भैया क्षीरसागर यांनी
या सुरू झालेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कामासंदर्भात संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना करत व सुरू झालेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या.


आ.संदीप भैया आणि सय्यद सलीम यांनी खंडपीठात पीआयएल केली होती दाखल

आ.संदिप क्षीरसागर व माजी आमदार सय्यद सलीम यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या विषयामध्ये पीआयएल दाखल होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *