बीड –बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीच्या महिलेला आरक्षण जाहीर झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आठ जिल्हा परिषद सर्कल अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहेत. विशेष म्हणजे एस सी साठी राखीव असलेल्या केज मतदार संघातून एकच जागा राखीव झाली आहे तर परळी मतदार संघातून तीन जागा एस सी साठी राखीव झाल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी याबाबत यादी जाहीर केली आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी राखीव जिल्हा परिषद गटाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. यामध्ये माजलगाव मतदार संघातील तालखेड आणि केसापुरी तर धारूर तालुक्यातून तेलगाव, केज मतदार संघातून होळ आणि परळी मतदार संघातून पिंप्री बुद्रुक,मोहा आणि जिरेवाडी या तीन जिल्हा परिषद गटामध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
म्हणजेच पुढील जिल्हा परिषद अध्यक्ष हा परळी, माजलगाव केज किंवा धारूर तालुक्यातील होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.





Leave a Reply Cancel reply