मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दसऱ्याच्या पूर्वसंध्येला खुशखबर!
बीड – महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र भगवानगड येथील वनखात्याची दहा एकर जमीन भगवानगड ट्रस्ट ला देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती देताना आपल्याला आनंद होत असल्याचे ट्विट केले आहे यामुळे भगवानगडांच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडी येथे असलेल्या आणि महंत भगवान बाबा यांनी स्थापन केलेल्या भगवान गडाला वनखात्याची 10 एकर जमीन मिळावी यासाठी महंत नामदेव शास्त्री यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून गडाला दहा एकर जमीन मिळण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठवला होता.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रस्तावासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले असून विजयादशमीच्या पूर्वसंध्येला त्यांनी ही गुड न्यूज तमाम भगवानगड भक्तांसाठी दिली आहे.












Leave a Reply