परळी- येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी माजीमंत्री पंकजा मुंडे यांची तर उपाध्यक्ष पदी चंद्रकांत कराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात दिलजमाई झाली असल्याचे पाहायला मिळाले होते.
भाजप नेते स्व गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी दोन पॅनल उभा केले होते.मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही बहीण भावात दिलजमाई झाली.त्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली.
दरम्यान कारखान्याच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी सोमवारी बैठक झाली.यामध्ये पंकजा मुंडे यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली तर व्हाईस चेअरमन म्हणून चंद्रकांत कराड यांची निवड झाली.या निवडीबद्दल पंकजा मुंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.












Leave a Reply