बीड / मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या सहा सात महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याचा दोष मुक्तीचा अर्ज बीडच्या न्यायालयाने फेटाळत कराडला मोठा दणका दिला आहे मंगळवारी कराडच्या अर्जावर सुनावणी झाली यावेळी जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम एडवोकेट बाळासाहेब कोल्हे यांनी सरकारच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली
सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्गुण हत्या करण्यात आली होती या प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याला अटक केली होती
या प्रकरणाची दहावी सुनावणी बीडच्या न्यायालयात मंगळवारी पार पडली वाल्मीक कराड याने त्याच्यावर लावलेल्या आरोप फेटाळत दोष मुक्तीचा अर्ज दिला होता मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत पुढील तारीख दिली आहे.





Leave a Reply Cancel reply