बीड -मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याच्या दोषमुक्ती बाबत 22 जुलै रोजी फैसला होणार आहे. आज न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेत पुढची तारीख दिली.
वाल्मिक कराड आणि इतर आरोपीच्या अर्जावर सोमवारी बीडच्या मोक्का न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने ऍड उज्वल निकम आणि ऍड बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली.
दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर मोक्का न्यायालयाने 22 जुलै ही तारीख दिली आहे. त्या दिवशी कराड दोषमुक्त होणार का यावर फैसला होणे अपेक्षित आहे.












Leave a Reply