पवार प्रकरणात अनेकांची युनिक चौकशी!
बीड – उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर पोलिसांनी या संकुलातील आणि आसपासच्या अनेक क्लासेस चालकांची दोन दिवस कसून चौकशी केली यातील एक युनिक प्राध्यापक हा गुन्हा दाखल झाला त्यावेळी आणि नंतर या दोन्ही आरोपींसोबत एका बर्थडे पार्टी मध्ये एन्जॉय करत होता त्यामुळे या युनिक प्राध्यापकाची बारा तासापेक्षा जास्त चौकशी पोलिसांकडून झाल्याची माहिती आहे.
बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारे घटना तीन दिवसापूर्वी उघडकीस आली प्राध्यापक विजय पवार प्राध्यापक प्रशांत खाटोकर या दोघांनी आपल्याला लज्जा येईल असे कृत्य करून आपला शारीरिक आणि मानसिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रार एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने दिल्यानंतर खळबळ उडाली
हे दोघेही गुरुजी गुन्हा दाखल झाल्यानंतर रातोरात फरार झाले मात्र फरार होण्यापूर्वी त्यांनी एका बर्थडे पार्टीत एन्जॉय केला होता आणि त्यांच्यासोबत एक युनिक प्राध्यापक जो त्यांचा धंद्यातील पार्टनर आहे ज्याने त्यांच्यासोबत अनेक डिजिटल वर आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो छापले आहेत त्याला पहाटे तीन वाजता पोलिसांनी चौकशीसाठी उचलून नेले
या युनिक प्राध्यापकाची कसून चौकशी झाल्यानंतर वाढवा काही राजकीय मंडळींनी यामध्ये फोनाफोनी करून या प्राध्यापकाचा काहीही संबंध नसल्याचे सांगत त्याला चौकशीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील केला विशेष बाब म्हणजे हा प्राध्यापक अलीकडच्या काळात पवार पवार सोबत अनेक कार्यक्रमात पाहिला आहे
देशभरातील नीट आणि आयआयटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या युनिक प्राध्यापकाने पवार याच्यासोबत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे डिजिटल लावले होते पण हा सगळा प्रकार झाल्यानंतर हे सगळे डिजिटल काढण्यात आले आहेत अशी चर्चा आहे.












Leave a Reply