बीड – शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात खाजगी कोचिंग क्लास घेणाऱ्या विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोन शिक्षकांनी केलेल्या गैर कृत्याच्या नंतर पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे पोलीस प्रशासनाने उमाकिरण संकुलाला कुलूप ठोकले असून सर्व क्लासेसला सुट्टी देत या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उमाकिरण शैक्षणिक संकुलात फिजिक शिकवणारे प्राध्यापक प्रशांत खटावकर आणि प्राध्यापक विजय पवार या दोघांनी एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीचे गेल्या एक वर्षापासून लैंगिक शोषण केले अशी फिर्याद या विद्यार्थिनीने दिल्यानंतर शिवाजीनगर पोलिसात या दोघांविरुद्ध पोस्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला.

उमाकिरण शैक्षणिक संकुलात बीड जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी क्लास साठी येतात याच ठिकाणी असे घृणास्पद कृत्य उघडकीस आल्यामुळे पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना उघड झाल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी देखील याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या नातेवाईकांना चौकशीसाठी पोलिसांनी ठाण्यात बोलावून घेतले आहे तर दुसरीकडे उमाकिरण शैक्षणिक संकुल सील करण्यात आले असून सर्व क्लासेसला सुट्टी देण्यात आली आहे.

या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्याचे दिसून आले.












Leave a Reply