News & View

ताज्या घडामोडी

240 172269472266ae3c42b28b6 ee6111a4193fb522e1393178cdd10a9e

जलजीवनचे 22 गुत्तेदार ब्लॅकलिस्ट!

बीड – जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या एकूण 1262 कामांपैकी 87 कामे समाधानकारक म्हणजे प्रगती 9 ते 25 टक्के प्रगती नाही आशा 33 कामे विहित कालावधीत काम प्रगतीपथावर नसल्याने वारंवार भेटी देऊन आणि सूचना देऊनही सुधारणा झाली नाही त्यामुळे 23 गुत्तेदरांना कारणे दाखवा नोटीस देऊन संबधीत कंत्राटदारांना काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये? याबाबत नोटीस बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी दि.23 रोजी दिली आहे. गुत्तेदारांना काळया यादीत टाकण्याबाबत नोटीस दिल्यामुळे खळबळ खाली आहे.


जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र शासनाचा कालबद्ध कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवस कार्यक्रमांतर्गत तात्काळ विहित कालावधीत पूर्ण कराव्याची आहेत. मात्र 87 कामाची प्रगती 0 ते 25 टक्के एवढी कमी झालेली आहे. यातील 33 कामांसाठी 22 गुत्तेदार आहेत. या 22 कंत्राटदानादारांना यादीत का टाकण्यात येऊ नये? याबाबत नोटिसा देण्यात आले आहेत.


खालील 22 कंत्राटदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.


मोहिनिराज कन्स्ट्रक्शन, तळेगाव घाट ता. अंबाजोगाई, अमोल बापूराव जाधव सनगाव, अंबाजोगाई, योगेश रामराव चव्हाण तेलंघाना, अंबाजोगाई, योगेश रामराव चव्हाण जळगाव ता. अंबाजोगाई, श्री जगदंबा कन्स्ट्रक्शन, भोपळा, परळी, विजय कन्स्ट्रक्शन रामेश्वरवाडी, केज, श्री विजय कन्स्ट्रक्शन दरडवाडी, केज श्री विजय कन्स्ट्रक्शन मुंढेवाडी केज, श्री विजय कन्स्ट्रक्शन, शिरूर घाट ता. केज, श्री विकास अर्जुन बांगर टोकवाडी वडवणी, श्री अजय सुदाम शिंदे, शिंगणवाडी तालुका धारूर, प्रगती कन्स्ट्रक्शन आगरनांदुर, गेवराई, प्रगती कन्स्ट्रक्शन काठोडा तांडा गेवराई निलेश अंबादास भवर गोगलगाव गेवराई, निलेश रामदास भवर गंगावाडी, गेवराई, राहुल रावसाहेब टेकाळे उखडपिंप्री, गेवराई, श्री विशाल वैजनाथ तांदळे आनंदवाडी ता. शिरूर (का.), राहुल रणजीत गरकळ श्रीपतवाडी, ता. शिरूर (का.), विवेक वात्री पाखरे, ढोकवड ता. शिरूर (का.), राहुल सिताराम घोडके माळेवाडी शिरूर (का.), राहुल सिताराम घोडके माळेवाडी ता.शिरूर (का.),
किशोर सुधाकर गायकवाड आनंदवाडी, माजलगाव, संकेत आबासाहेब धाये, कान्हापूर ता. माजलगाव, प्रगती कन्स्ट्रक्शन घलाटवाडी ता. माजलगाव, प्रगती कन्स्ट्रक्शन, हिंगणवाडी ता.माजलगाव, लुखेगाव, नाकलगाव, खतगव्हाण, ता.माजलगाव, संतोष विठ्ठल भालेराव बेदरवाडी, ता. पाटोदा, संभाजी भाऊसाहेब शिरसाट मांजरसुंबा ता. बीड, एम.टी. फड मांडवखेल, ता. बीड, स्वप्ना बाळू तुपे हिंगनी खुर्द ता. बीड, प्रतिक अरविंद मिसाळ, लमानतांडा ता.आष्टी, अक्षय अनंता शिरस्वाल, हनुमंतगाव, आष्टी या 33 कामे 22 कंत्राट दारा मार्फत सुरू आहेत. सदर 22 कंत्राटदारांना काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये? याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *