News & View

ताज्या घडामोडी

चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडेनी राजीनामा द्यावा -आ क्षीरसागर!

मुंबई -वाल्मिक कराड सरेंडर झाला असला तरी त्यांची 302 च्या गुन्ह्यात घेऊन चौकशी करावी, सीडीआर तपासावे अशी मागणी करत ही केस अंडर ट्रायल चालवावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी केली.

आ क्षीरसागर यांनी मंगळवारी मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमाशी बोलताना ते म्हणाले कि, मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली. त्यावर काळजी करू नका, दोषींना सोडणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.

वाल्मिक कराड हा सी आय डी समोर हजर झाला मात्र आपला हत्या प्रकरणात संबंध नसल्याचा दावा केला आहे याबाबत आ क्षीरसागर यांना विचारले असता ते म्हणाले कि, जर त्यांचा संबध नाही तर ते फरार का होते, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासल्यास सगळं बाहेर येईल, त्यांना 120 बोल अंतर्गत ताब्यात घेऊन चौकशी होणे आवश्यक आहे असेही आ क्षीरसागर म्हणाले.

मुंडेनी राजीनामा द्यावा – क्षीरसागर

जोपर्यंत या संपूर्ण प्रकारणाची चौकशी पूर्ण होतं नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी बीड जिल्ह्यातील जनतेची मागणी आहे, याबाबत सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी मागणी केली आहे. असेही आ क्षीरसागर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *