News & View

ताज्या घडामोडी

IMG 20240909 WA0018

मीडिया ट्रायल च्या माध्यमातून माझी बदनामी -मुंडे!

वाल्मिक कराड यांचे आ धस यांच्याशी सुद्धा संबंध!

मुंबई -सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून मीडिया ट्रायल सुरु आहे, त्यामाध्यमातून माझी बदनामी केली जातं आहे, आरोपी कोणीही असो त्याला फाशीच झाली पाहिजे असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे आहेत मात्र त्यांचे अन आ सुरेश धस यांचे देखील संबंध आहेत अशी माहिती मुंडे यांनी दिली.

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, खाते वाटपानंतर आज मी पहिल्यांदाच विभागाची बैठक घेतली. 100 दिवसांचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यावर काम सुरू करण्यात आले आहे. आज मुख्यमंत्र्याशी कोणतीही भेट चर्चा झाली नाही. योगायोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे होते. त्यामुळे त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांना नमस्कार केला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले की, संतोष देशमुखाची हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यातील सगळ्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही माझी भूमिका आहे. मात्र, संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण सुरू असून त्यासाठी माझ्या नावाचा वापर होत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला.

देशमुख हत्या प्रकरण गंभीर असून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालला पाहिजे असेही त्यांनी म्हटले. या प्रकरणाबाबत मी पहिल्या दिवशीच पक्षाच्या नेतृत्त्वाशी चर्चा केली असून सगळी कल्पना त्यांना दिली असल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

वाल्मिक कराडची जवळीक सुरेश धस सोबतही होती. माझ्यासोबतही आहे. या प्रकरणातील आरोपी माझ्यासह कोणाचाही निकटवर्तीय असला तरी सोडता कामा नये. त्याला शिक्षा झाली पाहिजे असेही मुंडे यांनी म्हटले.

माझ्याविरोधात बोलल्याशिवाय काहींचा दिवस चांगला जात नाही. त्यामुळे सकाळी-सकाळी त्यांना माझे नाव घ्यावं लागतं असा टोला मुंडे यांनी विरोधकांना लगावला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मीडिया ट्रायलच्या माध्यमातून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणातील सत्याचा माध्यमांनी शोध घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. मंत्रिपदाची शपथ घेण्याआधीपासून माझ्यावर टीका सुरू आहे. मीडिया ट्रायल करून मला समाजकारणातून बाद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *