नागपूर -मसाजोग प्रकरणात विरोधकांकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केले जातं असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे आहेत हे मी मान्य करतो पण प्रकरणाबाबत स्वतः मुख्यमंत्री निवेदन करणार आहेत, तोपर्यंत थांबा असं म्हणत मुंडे यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली.
मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येंनंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी या मुद्यावर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. या विषयावर मंत्री धनंजय मुंडे पत्रकारांशी बोलले. “त्यांच्या सख्ख्या भावाने धनंजय देशमुख यांनी स्वत: स्टेटमेंट केलं आहे. ते स्टेटमेंट केल्यानंतर अशा अतिशय घाणेरड्या घटनेत माझा संबंध लावणं म्हणजे यांना कुठेतरी राजकारण आणायच आहे. मूळात आता हा विषय सभागृहात आणला. आदरणीय मुख्यमंत्री स्वत: यावर बोलणार आहेत. ही घटना का झाली? कशी झाली? याला काय कारण आहे? कोण जबाबदार आहे? काय चौकशी झाली? किती आरोपींना अटक झाली? याबाबत मुख्यमंत्री स्वत: बोलणार आहेत, तो पर्यंत थांबा” असं धनंजय मुंडे म्हणाले.
वाल्मिक कराड यांच्यासोबत फोटो व्हायरल होतोय, त्यावर धनंजय मुंडे म्हणाले की, “बीड जिल्ह्यातून अनेक जण येतात, फोटो काढतात. त्यामुळेच मला आज दीड तास उशिर झाला. त्यांना आमच्यासोबत फोटो काढायचा असतो, आम्हाला तो द्यायचा असतो. ते त्या फोटोच व्यक्तीगत जीवनात काय करतात? याचा संबंध आमच्याशी येत नाही” असं धनंजय मुंडे म्हणाले. “अशा घाणेरड्या प्रवृत्तीला, खून करणाऱ्या लोकांना आम्ही मदत करतोय, पाठबळ देतोय असं कधी जमलं नाही. आजपर्यंत राजकारणात, समाजकारणात इतक्या वर्षात असं कधी केलेलं नाही” असं धनंजय मुंडे म्हणाले.
‘हे मी हाऊसचा अपमान केल्यासारख’
“या प्रकरणात कारवाई पहिल्या दिवशी झाली. चार आरोपींना अटक झाली. पोलिसांच्या आठ टीम तयार करण्यात आल्या आहेत. आरोपींना अटक होईल. मी या विषयी जास्त बोलण्यापेक्षा आदरणीय मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत, ते स्वत:च निवेदन करणार आहेत. त्यामुळे मी हाऊसच्या बाहेर बोलणं हे मी हाऊसचा अपमान केल्यासारख आहे” असं धनंजय मुंडे म्हणाले.
Leave a Reply