News & View

ताज्या घडामोडी

images 2023 09 08T225641.264

आ क्षीरसागर यांची बदनामी, बीडमध्ये गुन्हा दाखल!

बीड – विधानसभा निवडणुकीत प्रचार थांबल्यानंतर बीड विधानसभा मतदार संघांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांचा फोटो आणि समोर ट्रम्पेट हे चिन्ह छापून बदनामी केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

बीड विधानसभा निवडणुकीत 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यानंतर शहरातील गांधीनगर भागात काही लोक एक उर्दू भाषेत छापलेले पत्रक वाटतं असल्याचे आढळून आले. ज्यामध्ये बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांचा फोटो छापलेला आहे. ज्यावर उर्दू भाषेत संदीप क्षीरसागर यांच्या त्रंपेट या निशाणीसमोरील बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Sharadpawar!बीडमध्ये एकनिष्ठतेला पसंती!#beed #eknathshinde #modi #शरदपवार #devendrafandvis#अजितपवार

याबाबत माहिती मिळाल्यानंतर आचारसंहिता एफ एस टी पथकातील अमोल शिंदे यांनी शिवाजीनगर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version