News & View

ताज्या घडामोडी

images 2024 11 17T003635.300

पाठलाग करत गोळीबार, दोन जखमी!

अंबाजोगाई -बीड वरून लातूर कडे जाणाऱ्या स्कोर्पिओ गाडीचा पाठलाग करत फॉरच्यूनर गाडीमधून आलेल्या लोकांनी गोळीबार केल्याची घटना सेलूआंबा नजीक घडली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.

संदीप तांदळे आणि अभय पंडित हे काकडहिरा ता बीड येथील रहिवासी असलेले दोन जण जखमी झाले आहेत.

गोळीबार करणारे कोण लोक होते, या गोळीबारमागील कारण काय आहे, विधानसभा निवडणुकीशी याचा काही संबंध आहे का याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरु आहे.

Mahayuti!अपक्ष विजय रथ रोखणार!#beed #eknathshinde #modi#शरदपवार #devendrafandvis#अजितपवार #filmorago

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version