बीड – ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी प्रकरणात अडीच महिन्यापासून फरार असलेल्या यशवंत कुलकर्णी याला पोलिसांनी पुण्यात जेरबंद केले. त्याच्यासह त्याचा मुलगा देखील ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
ज्ञानराधा (dnyanradha multistete )मल्टीस्टेट प्रकरणात सुरेश कुटे, अर्चना कुटे, यशवंत कुलकर्णी यांच्यासह सर्वच संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तब्ब्ल चालीस ते पन्नास गुन्हे आतापर्यंत दाखल झाले आहेत.
अडीच महिन्यापूर्वी सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर यांना पोलिसांनी अटक केली होती, मात्र यशवंत कुलकर्णी, अर्चना कुटे फरार झाले होते. दरम्यान शुक्रवारी कुलकर्णी पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
Leave a Reply