बीड – ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणात पोलीस कोठडीत असणारे सुरेश कुटे यांच्या बीड, छत्रपती संभाजीनगर येथील घर, दुकान, फॅक्ट्री व इतर मालमत्तावर सक्त वसुली संचलाणलंय अर्थात ईडी ने छापे घातले आहेत.
कुटे यांना दोन अडीच महिन्यापूर्वी अटक झाल्यानंतर त्याची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरु झाली होती. दरम्यान आतापर्यंत कुटे विरोधात तीनशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पन्नास पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता ईडी ची इंट्री झाली आहे
ईडी च्या अधिकाऱ्यांनी रात्री आठ वाजेपासून राधा क्लोथ सेंटर, हिरालाल चौक, एम आय डि सी येथील फॅक्ट्री, गोडावून, घर, संभाजीनगर येथील फॅक्ट्री सील केली आहे.





Leave a Reply Cancel reply