News & View

ताज्या घडामोडी

सिलेंडर स्फोटात एक ठार चार जखमी !

परळी- शहरातील बरकत नगर येथे एका घरात सिलेंडर चा स्फोट होऊन एकजण ठार तर चार जण जखमी झाले आहेत.घराला अचानक लागलेल्या आगीमुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अदिल उस्मान शेख (वय १४) असं स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तर शमशाद बी सय्यद हाकीम, शेख आवेस गौस व अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर परळी शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीवरून घटनास्थळ  असणाऱ्या घराच्या बाजूला आग लागली होती. आग एका बंद असलेल्या रूममध्ये जाऊन तेथील गॅसचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की बाजूला असलेल्या अदिल शेख याच्या पोटाला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
तर शमशाद बी सय्यद हाकीम,शेख आवेस गौस व अन्य दोन जण जख्मी झाले. दरम्यान घटनेची माहिती कळताच परळी पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *