News & View

ताज्या घडामोडी

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य!

मेष:-

या राशीच्या लोकांचे आरोग्य बिघडू शकते. पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी चांगली बातमी मिळू शकते. कामात यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढू शकतात.सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल. शासकीय पोलिस यंत्रणेतील व्यक्तींना उत्तम दिनमान आहे. व्यापार व्यवसायात तेजी राहिल. एकत्रित सहलीचे नियोजन कराल. मुलांच्या हट्टापायी चैनीच्या वस्तूसाठी खर्च करावा लागेल. समाजात केलेल्या कार्याची स्तुती होईल. आर्थिक लाभ होतील.

वृषभ:-

या राशीच्या लोकांना मनःशांती मिळेल. मित्रासोबत नवीन काम सुरू करू शकाल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. ऑफिसच्या कामात यश मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.अनावश्यक राग करू नका. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. यात्रा सुखात होण्याचे योग आहे. व्यापारात फायद्याच्या नवीन संधी मिळतील. भागीदारांकडून सहकार्य लाभेल. मित्र मैत्रिणींकडून कामाबद्दल सहकार्य मिळेल.कौटुंबिक सौख्य चांगले राहिल. संततीची प्रगती पाहून मन समाधानी होईल. आकस्मित धनप्राप्ती व प्रवासातून लाभ घडतील.

मिथुन:-

या राशीच्या लोकांना परदेशातून चांगली बातमी मिळू शकते. भावंडांचे कामात सहकार्य मिळेल. एखाद्या मित्राकडून सल्ला मिळू शकतो. नवीन लोकांची भेट फलदायी ठरेल.धर्मसत्ता राजसत्तेतिल लोकांपासून फायदा होईल. मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. रोजगारात आपल्या स्वभावाचा इतर गैरफायदा तर घेत नाहीत ना याकडे लक्ष दया. नवीन व्यापारात प्रगती होण्याचे संकेत मिळतील. व्यापारात नवीन संबंध प्रस्थापित होईल. मुलांच्या कामाकडे लक्ष दया. घरातील सदस्यांची प्रगती होईल. देवयात्रा व तिर्थक्षेत्री प्रवास कराल.

कर्क:-

या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. मानसिक त्रास होऊ शकतो. ऑफिसमध्ये नवीन काम मिळू शकते. सहकाऱ्यासोबत वेळ घालवता येईल. सर्व कामे सहज पूर्ण होतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी वाढेल.मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. व्यापाराकरिता आजचा दिवस नुकसान हानीची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक व्यवहार करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

सिंह:-

या राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. दैनंदिन व्यवहारात बदल दिसून येतात. जोडीदाराच्या मदतीने नवीन काम सुरू करता येईल. पालकांकडून आर्थिक पाठबळ मिळू शकते.शत्रूवर मात कराल.स्थावर संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक स्थिति सुधारेल.कर्ज प्रकरणं मंजुर होतील. कोणताही टोकाचा विचार किंवा अतिरेकी वृत्ती टाळा. व्यसनापासुन दुर राहा. मित्रमैत्रिणित स्नेह वाढेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी आणि भावंडांबरोबर बरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. 

कन्या:-

या राशीच्या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. व्यवसायात लाभ होऊ शकतो. नवीन लोकांची भेट शुभ राहील. या राशीच्या लोकांचे मन अशांत राहील.चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढा राहिल. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. नुकसान होऊ शकते. कौटुंबिक पातळीवर पत्नी व इतर सदस्यांकडून असहकार्य मिळाल्यामुळे मन नाराज होऊ शकते. आपल्या लहान सहान इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती आवक झाल्याने काही समाधान लाभेल.

तूळ:-

लोकांचे आरोग्य चांगले राहील. समाजात लोकप्रियता वाढू शकते. भागीदारी व्यवसायात लाभ होऊ शकतो. मित्रांकडून आर्थिक मदत मिळू शकते. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल.बोलण्यावर संयम ठेवावा. हितशत्रुचा काही प्रमाणात त्रास होऊ शकतो. धंदा व्यवसायात मोठ्या व्यवहारात पुरेशी काळजी घेणे हिताचे ठरेल. भागीदारीत अपेक्षित लाभ होयाचे योग आहेत. लेखन कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन प्रकल्प हाती येतील. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. प्रेमसंबंधात जोडीदारांकडून भेटवस्तु मिळतील.

वृश्चिक:-

या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत बदल होऊ शकतो. ऑफिसमध्ये पुढे जाण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल.घरामध्ये छोट्या समारंभाच्या निमित्ताने प्रियजनांची गाठभेट होईल. व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल. आपली कार्यकुशलता व इतराच्या सहयोगाने कामात यश येईल. आपले विचार योग्य ठेवा. शासकीय सेवेत कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे. जोडीदाराच्या व संततीच्या प्रकृतीकडे लक्ष दया. वाहन घर खरेदीचा योग आहे. राजकिय व्यक्तींकडून सहकार्य लाभेल.

धनू:-

या राशीच्या लोकांना कार्यालयीन कामात यश मिळू शकते. भाग्यात वाढ होईल. मित्रासोबत नवीन काम सुरू करता येईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.कामातली प्रगती पाहून समाधान व्यक्त कराल. संततीच्या दृष्टीने येणाऱ्या शुभवार्ता अभिमानास्पद ठरतील. व्यापारात दिनमान उत्तम आहे. व्यापारिक वाद संपुष्टात येतील. आप्तेष्ट नातेवाईकांशी असलेले संबंध मर्यादित ठेवा. विचाराधीन असलेली कामे पार पडतील. मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. प्रतिष्ठा मान सन्मान प्राप्त होईल. 

मकर:-

या राशीच्या राशीच्या लोकांचे मन अस्वस्थ राहू शकते. मानसिक तणाव जाणवू शकतो. ऑफिसमध्ये जास्त काम मिळू शकते.मानसिक अस्थिरतेचा परिमाण रोजगारात जाणवेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कटुता निर्माण होईल असे बोलणे वागणे टाळावे. अंहकारीवृत्तीला आळा घाला. अचूक मेहनत करूनही फळ कमी प्रमाणात मिळेल. व्यापारात आपले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रकरणात गुंतले जाण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील.

कुंभ:-

या राशीच्या लोकांच्या मनात नकारात्मक विचार येतील. आर्थिक संपत्तीचे नुकसान होऊ शकते. भागीदारी व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल.व्यापारिक निर्णयात मात्र गोपनीयता बाळगा. रोजगारात दिनमान उत्तम आहे. आर्थिक योजनावर चर्चा व्यापार-व्यवसाय चांगला चालेल. इतरांना न जमणारी कामे तुम्ही यशस्वीरित्या हाताळाल. त्यामुळे वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहिल. कार्यक्षेत्रात नवीन कामाच्या योजनेमुळे फायदा होईल. कटुता निमाण होईल असे बोलणे मात्र टाळावेत. कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घ्या. मेहनतीचे उचित फळ मिळेल .

मीन:-

या राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. सर्व कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल.सहनशीलता कमी होऊ देऊ नका. व्यापारात नवीन योजनावर कार्य सुरु होईल. नातेवाईकांबदल विचारात बदल होईल. मनाचा दाखविलेला मोठेपणा नातेसंबंधातील तेढ कमी करणारा ठरेल. मोठ्या व्यक्तींच्या सहकार्याने रोजगारात फायदा होईल. आपल्या अंगीभूत असणाऱ्या कलागुणांना वाव मिळेल. जोडीदार नोकरीत असेल तर वेतनवाढ बढतीचे योग आहेत. गृहसौख्य उत्तम लाभेल. आरोग्याच्या तक्रारी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version