News & View

ताज्या घडामोडी

निवडणुकीसाठी प्रशासनाने सज्ज रहावे- देशपांडे !

बीड- ग्राम पातळीवर जाऊन मतदारांची नोंद घ्या,मयत किंवा स्थलांतरित मतदार कोणी असतील तर यादी अपडेट करा ,निवडणूक कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही अस म्हणत राज्याचे मूळचे निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

सन 2024 च्या आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  विविध जिल्हयांना भेटी देत आढावा घेण्यात येत आहे.  गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, बीएलओ, अंगणवाडी सेविका यांचा गट तयार करुन त्यांच्याकडून मतदार यादी तपासून घेण्यात यावी. पात्र मतदारांची नोंदणी वाढवावी. तसेच मतदार यादीतील मयत व स्थलांतरीत मतदारांची वगळणी करण्यापूर्वी खात्री करावी. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व कामकाज काळजीपूर्वक करावे.  एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही. तसेच निवडणुकीच्या वेळी मतदार यादी बाबत कोणतीही तक्रार होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. 

            नवमतदार, स्त्री मतदार व वंचित घटकांचा  मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. नवमतदारांची  नोंदणी वाढविण्यांसाठी जिल्हयातील सर्व शाळा, महाविद्यालयामध्ये विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात यावी.  महाविद्यालयातील प्रवेशाच्यावेळी संबधित विद्यार्थ्यांकडून मतदार नोंदणीचा फॉर्मही भरुन घ्यावा. या बाबतचे छापील माहिती पत्रक सर्व महाविद्यालयांना उपलब्ध करून देण्याचे  निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

            सन 2023 च्या मतदार यादी कामकाजामध्ये जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी केलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाबाबत त्यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी, ईव्हीएमची उपलब्धता, ईव्हीएम साठवणूक व निवडणूकीसाठी लागणाऱ्या जागेची उपलब्धता आदी बाबींचाही आढावा घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *