अंबाजोगाई- अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पॅनलचे 15 संचालक मोठ्या फरकाने विजयी झाले असून माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे केवळ तीन संचालक निवडून आले आहेत हा पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे
बीड जिल्ह्यातील बीड गेवराई माजलगाव वडवणी केज अंबाजोगाई आणि परळी यासह पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक पार पडली या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते अंबाजोगाई आणि परळी मध्ये मुंडे बहीण भावात तर बीडमध्ये क्षीरसागर काका पुतणे मध्ये लढत होती
अंबाजोगाई बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी 15 जागेवर धनंजय मुंडे यांचे उमेदवार विजयी झाले आहेत अंबाजोगाई आणि परळी मध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आपले ताकद पणाला लावली होती मात्र अंबाजोगाई धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल एकतर्फी विजय मिळवत पंकजा मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे
Leave a Reply