बीड- अंजुमन इशात ए तालीम या संस्थेच्या मिलिया शाळेत आमेर काझी या शिक्षकाने शाळेतील काही महिला शिक्षिकासोबत शाळेच्या वर्गखोली मध्ये सेक्स केल्याचे प्रकरण न्यूज अँड व्युज ने उघडकीस आणले होते.गेल्या महिनाभर पासून न्यूज अँड व्युजने हा विषय लावून धरला होता.अखेर आमच्या पाठपुराव्याला यश आले आहे.मिलिया शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या फिर्यादीवरून आमेर याच्या विरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड येथील मिलिया शाळेतील शिक्षक आमेर काझी याने आपल्या शाळेतील काही शिक्षिका यांच्यासोबत अश्लील चाळे केल्याचे प्रकरण न्यूज अँड व्युजने उघडकीस आणले होते. आमेर याने 2012 ते 2023 या काळात शाळेतील शिक्षिका व इतर महिला सोबत शारीरिक संबंध ठेवले.
हे करताना त्याने याचे व्हिडीओ तयार केले.हे व्हिडीओ त्याने काही पॉर्न साईट ला विकल्याचे न्यूज अँड व्युजने ठामपणे म्हटले होते.या प्रकरणात सुरवातीला आमचा काही संबंध नाही,आमच्या शाळेचा, संस्थेचा यात सहभाग नाही असा दावा संस्थाचालकांनी केला होता.
न्यूज अँड व्युज ने या प्रकरणात तब्बल चौदा भाग प्रसारित करत यु ट्यूब चॅनेल च्या माध्यमातून या शाळेतील हे सेक्स रॅकेट उघडकीस आणले होते तरीदेखील शाळेचे व्यवस्थापन यावर गंभीर नव्हते.समाजाने या प्रकरणात संस्थेला जाब विचारला.शेकडो विद्यार्थ्यांनी आपले दाखले काढून दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घेतले.
आमेर च्या या कुटाण्यात संस्था आणि काही शिक्षक,शिक्षिका दोषी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संस्थेने आमेर यांच्यासह तीन शिक्षकांना निलंबित केले तर दोघी जणींना व्ही आर एस घेण्यास भाग पाडले.म्हणजेच न्यूज अँड व्युज ने वेळोवेळी जो दावा केला होता तो सत्य होता हे सिद्ध झाले आहे.
तेव्हाच न्यूज अँड व्युजच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले होते. दरम्यान शनिवारी सायंकाळी पाच वाजेपासून काही संस्थाचालक आणि मुख्याध्यापक बीड शहर पोलिसात बसून होते.रात्री उशिरा या प्रकरणात आमेर काझी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- माजलगावच्या संस्थेचे पाकिस्तान कनेक्शन उघड!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
आमेर याने शाळेच्या परीक्षा विभागात काही महिलांसोबत सेक्स करतानाचे व्हिडिओ तयार केले असल्याची माहिती शाळेच्या शिपायाने आपल्याला दिली,तसेच हे व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित झाल्याचे सांगितले.आमेर ने हे व्हिडीओ पॉर्न साईट ला विकल्याचे देखील उघड झाले आहे.त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत मुख्याध्यापक सय्यद अब्दुल सत्तार यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलिसात कलम 292 (2),कलम 294,कलम 500,66,67,66 ब,67 क नुसार आमेर व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या महिनाभरापासून न्यूज अँड व्युजने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. आमेर चे काळे कारनामे उघडकीस आणले. संस्था आणि संस्थाचालक तसेच काही शिक्षिका यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सातत्याने लावून धरली.अखेर संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.आता पोलिसांनी या प्रकरणात सगळे व्हिडीओ ताब्यात घेऊन यामध्ये दोषी असणाऱ्या महिला,शिक्षक तसेच संस्था चालक यांच्यावर देखील कारवाई करणे आवश्यक आहे.





Leave a Reply Cancel reply