बीड- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीड शहरांमध्ये दुपारच्या सुमारास अचानक आंदोलकांनी दगडफेक केल्यामुळे अनेक भाग बंद झाले आहे सुभाष रोड बोंडा जालना रोड या भागात शेकडो आंदोलन रस्त्यावर येऊन त्यांनी घोषणाबाजी करत दगडफेक केल्यामुळे बाजारपेठ तातडीने बंद झाली शहरात वातावरण तणावपूर्ण बनलेले असताना पोलीस मात्र रस्त्यावर नसल्याचे चित्र दिसून आले
मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठवाड्यासह महाराष्ट्रात गाजत असून बीड जिल्ह्यात माजलगाव परळी बीड वडवणी गेवराई या भागात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत दरम्यान सोमवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान जालना रोड अण्णाभाऊ साठे चौक सुभाष रोड मोंढा या भागामध्ये दगडफेकीच्या घटना घडल्यामुळे व्यापार पेठ बंद झाली
- अप्पर ची पाठ फिरताच तहसीलदार खोमणेचा धंदा सुरु!
- रस्त्याची कामे करताना मार्कआउट बदलण्याचे प्रकार!
- आजचे राशीभविष्य!
- घरकुल च्या नावाखाली शंभर कोटींचा वाळू उपसा!एस आय टी चौकशीची आ पंडित यांची मागणी!
- आजचे राशीभविष्य!
सुभाष रोड भागात आंदोलकांनी रस्त्याच्या मधोमध असलेले बॅरिक्रेट्स आडवे टाकून रस्ता पूर्णपणे बंद केला या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला होता एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत त्यांनी आंदोलन केले यावेळेस रस्त्यावर एकही पोलीस अधिकारी हजार नसल्याचे दिसून आले नगर रोड भागात देखील अनेक ठिकाणी दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत






Leave a Reply Cancel reply