बीड- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बीडमध्ये हजारो मराठा बांधव कँडल हातात घेऊन रस्त्यावर उतरले. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, आरक्षण देत कस नाही,घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देत बीडमध्ये हजरो मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला कँडल मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाला
मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडमध्ये कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.
- शिक्षणाधिकारी हिंगोणेकर यांना अटक!
- आजचे राशीभविष्य!
- दीड महिना झाला तरी वाळू चोरीतील तलाठी मंडळ अधिकारी पोलिसांना सापडेनात!
- आजचे राशीभविष्य!
- एटीएस चे माजलगावात छापे!
छत्रपती शिवाजी महाराज चौकात कँडल मार्च संपन्न झाला.शिस्तबद्ध पध्दतीने यामध्ये नागरिक सहभागी झाले होते.





Leave a Reply Cancel reply