News & View

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना अडवाल तर आडवं करू- जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचा ईशारा !

बीड- तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जातो.याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी शेकडो शिवसैनिक आणि शेतकऱ्यांसह पंचायत समिती कार्यालय गाठले.एकही शेतकऱ्यांची अडवणूक झाली तर अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईल ने सरळ करू असा इशारा यावेळी जगताप यांनी दिला.

गेल्या काही दिवसांपासून बीड तालुक्यातील पंचायत समितीचे अधिकारी तथा कर्मचारी शेतकरी बांधवांची निरर्थक लूट करत असल्याच्या तक्रारी शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांच्याकडे होत होत्या. बीड तालुका पंचायत समितीच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य शेतकरी पार वैतागले होते. यामुळेच अनिलदादा जगताप यांनी काल पं स मध्ये जाऊन अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पंचायत समितीमधील जे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांची लूटमार करत आहेत व त्यांना वेठीस धरत आहेत अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनिलदादा जगताप यांनी आठ दिवसांत आपल्या कामात सुधारणा करण्याचा अल्टीमेटम दिला आहे.

पं स कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याची उपस्थिती आपल्या खुर्चीवर असणे गरजेचे आहे. प्रत्येकाचे फोन उचलणे अधिकाऱ्याचे कर्तव्य असून पं स मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला अधिकारी, कर्मचाऱ्याने सन्मानाची वागणूक द्यायला हवी. बीड तालुका पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीसाठी विहिर मंजूर झाल्यानंतर मस्टर काढण्यासाठी फळबाग मस्टर काढण्यासाठी पैशाची मागणी केली जाते, घरकुल कामासाठी व इतर कामे करून देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते, सर्वसामान्य लोकांची कामे होत नाहीत, अशा तक्रारी इथूनपुढे आमच्याकडे आल्या तर त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शिवसेनेचा दणका काय असतो ते दाखवून देऊन असा इशारा यावेळी अनिलदादा यांनी पंचायत समितीला दिला. याप्रसंगी अनिलदादा जगताप यांच्यासामवेत बीड शिवसेनेचे सर्व शेतकरी, पदाधिकारी, शिवसैनिक तथा पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *