News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beednewsandview

  • संभाजीनगर मधून मंत्री भुमरे मैदानात !

    मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघात अखेर शिवसेनेकडून मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.येथे आता एमआयएम,उबाठा आणि शिवसेना असा तिरंगी सामना रंगणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भूमरे हे शिवसेनेकडून लोकसभेच्या आखाड्यात असतील. संभाजी नगर हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. परंतु २०१९ मध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला…

  • शिवसंग्राम च्या मेटे यांची माघार !

    बीड-शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी बीड लोकसभेच्या मैदानातून शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी माघार घेतली आहे. व्यापक समाजहित लक्षात घेऊन, मतांचे विभाजन होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याचे ज्योती विनायकराव मेटे स्पष्ट केलं आहे. त्या बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या. ज्योती मेटे म्हणाल्या की, मी बीड लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी जनभावना…

  • जम्मू,त्रिपुरा,आसाम,पश्चिम बंगाल मध्ये रेकॉर्डब्रेक मतदान !

    नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात देशातील 102 लोकसभा मतदारसंघात सरासरी 59 टक्के मतदान झाले.सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगाल मध्ये 77 टक्के इतके झाले आहे.आसाम,त्रिपुरा ,जम्मू काश्मीर या राज्यातही रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले आहे. महाराष्ट्रात 54.85 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 77.57 टक्के तर उत्तर प्रदेशात 57.54 टक्के मतदान झाले.महाराष्ट्रात गडचिरोली, भंडारा -गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि रामटेक…

  • बीड पोलिसांच्या डोळ्यावर पैशाची पट्टी !

    307 मधील आरोपी पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रचारात ! बीड-जिल्हा पोलीस दलाला पैसे खाण्याचा रोग लागला की  राजकीय दबावाखाली काम करण्याची नवी पद्धत बीडच्या एसपींनी अंगवळणी पाडून घेतली आहे  अशी शंका येऊ लागली आहे .शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले सत्ताधारी पक्षाचे कुंडलिक खांडे यांच्यावर 307 सारखा गंभीर गुन्हा असताना देखील ते उजळ माथ्याने लोकसभेच्या प्रचारात हिंडत आहेत आजी-माजी…

  • चारवेळा अपयश तरीही जिद्द कायम ठेवत मिळवले यश !

    बीड- शिरूर तालुक्यातील पाडळी येथे प्राथमिक शिक्षण घेत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत बीडीओ म्हणून नोकरी मिळवली,नोकरी करत करत यूपीएससी चा अभ्यास सुरू ठेवला,चारवेळा अपयश आले तरीही खचून न जाता पाचव्यांदा यश मिळवत आपलं लक्ष्य गाठणाऱ्या अभिजित पाखरे याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अभिजीत पाखरे यांचे प्राथमिक शिक्षण पाडळी येथे झाले. माध्यमिक शिक्षण बीडमधील चंपावती…

  • शरद पवारांच्या माजलगाव, बीड आणि अंबाजोगाई मध्ये सभा !

    मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढील काळात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 50 सभा होणार आहेत.बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी माजलगाव, बीड आणि अंबाजोगाई या ठिकाणी सभा होणार आहेत.पवारांनी बारामती नंतर अहिल्यानगर (अहमदनगर)आणि बीडवर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे सर्वेसर्वा शरद पवार महाराष्ट्रभर मॅरेथॉन दौरा करणार असून २२ दिवसांमध्ये…

  • पुढील पंचवीस वर्षाचे आपले नियोजन – मोदी !

    नवी दिल्ली- पुढील पाच वर्षासाठी नव्हे तर माझ्याकडे 25 वर्षासाठीचे नियोजन आहे,2047 साली भारत हा विकसित राष्ट्र असेल त्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ईडी,इलेक्ट्रोल बॉण्ड या सर्व आरोपांवर मोदी यांनी उत्तर दिले. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी गेल्या दहा वर्षातील कार्यकाळ आणि पुढील 25 वर्षाचे…

  • अवकाळीच्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी !

    तातडीने पंचनामे करण्याचे कृषिमंत्री मुंडेंचे आदेश ! धारूर – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला ब्रेक देत पडत्या पावसात धारूर तालुक्यातील चोरंबा, सोनीमोहा, आंबेवडगाव आदी गावांना भेटी देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या आंबा, डाळिंब, मिरची, टोमॅटो आदी पिकांची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांना धीर दिला. अवकाळीने फळांची व भाज्यांची पडझड झाली असून मोठ्या…

  • अवकाळी पाऊस ,गारपिटीने शेतकरी उध्वस्त !तातडीने पंचनामे करण्याचे आदेश !!

    बीड -जिल्ह्यात विविध भागात गुरुवारी दुपारी वादळीवार्‍यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला तर धारुर, वडवणी व गेवराई तालुक्यात गारा बसरल्या. यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दरम्यान गुरुवारी झालेल्या गारपीटीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून मदत आचारसंहिता संपल्यावर मिळेल अशी माहिती कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सकाळच्या सत्रामध्ये अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण…

  • जालन्यात डॉ कल्याण काळे !

    मुंबई- काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील जालना आणि धुळे मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत. जालन्यात माजी आ कल्याण काळे यांना तर धुळे मधून शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने आपली चौथी यादी जाहीर केली,ज्यामध्ये महाराष्ट्रातून धुळे आणि जालना येथील उमेदवारांची घोषणा केली आहे.छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील माजी आ डॉ कल्याण…