News & View

ताज्या घडामोडी

संभाजीनगर मधून मंत्री भुमरे मैदानात !

मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघात अखेर शिवसेनेकडून मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.येथे आता एमआयएम,उबाठा आणि शिवसेना असा तिरंगी सामना रंगणार आहे.

राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भूमरे हे शिवसेनेकडून लोकसभेच्या आखाड्यात असतील. संभाजी नगर हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. परंतु २०१९ मध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. तिथे एमआयएमचे इम्तियाज जलील याचा विजय झाला होता.

यावेळी ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे इच्छूक होते. त्यांनी जाहीरपणे तशी मागणीदेखील केली होती. दुसरीकडे खैरेही इच्छूक होते. पक्षाने खैरेंना मैदानात उतरवलं. तरीही दानवेंनी नाराजी व्यक्त केली नाही. त्यानंतर खैरेंनी ही शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर केलं.

शिवसेनेने शनिवारी मंत्री संदीपान भूमरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे शिवसेना, ठाकरे गट, एमआयएम अशी तिरंगी लढत छत्रपती संभाजी नगरमध्ये बघायला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *