News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beednews

  • लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न !

    नवी दिल्ली- भारताचे माजी उपपंतप्रधान तथा भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान जाहीर झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.स्वातंत्र्य प्राप्ती पासून ते आजपर्यंत म्हणजेच पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ सक्रिय राजकारणात सहभाग असलेल्या अडवाणी यांना हा बहुमान मिळाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. लालकृष्ण अडवाणी हे  इ.स. १९७७ ते इ.स. १९७९ या काळात…

  • बीडच्या सचिनने ठोकलं शतक !

    नवी दिल्ली- अंडर 19 क्रिकेट वल्ड कप मध्ये बीडच्या सचिन धस याने पदार्पणातच शतक ठोकत नेपाळ विरुद्ध मोठी धावसंख्या उभारत भारताचा डाव सावरला . नेपाळ विरुद्ध सचिन धस याच्यानंतर उदय याने शतक ठोकलं. उदय आणि सचिन या दोघांनी केलेल्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने नेपाळसमोर 298 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून…

  • महिला,कृषी विभागासाठी अर्थसंकल्प मध्ये मोठी तरतूद !

    नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना कृषी आणि महिलांसाठी विशेष योजनेची घोषणा केली.पन्नास मिनिटात त्यांनी आपलं भाषण पूर्ण केले.जुलै 2024 मध्ये मोदी सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निर्मला सीतारामन यांनी म्हटले की,वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च 44.90 कोटी रुपये…

  • विशाल साडी सेंटर फोडले !

    बीड- शहरातील डीपी रोडवर असलेले विशाल साडी सेंटर या दुकानाचे शटर तोडून चोरट्यानी जवळपास साडेचार लाख रुपयांची रोकड चोरी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. बीड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सारडा नगरी समोर असलेल्या चंद्रप्रकाश सेठी यांच्या विशाल साडी सेंटर मध्ये बुधवारी चोरी झाली.दुकानाचे समोरचे शटर तोडून चोरट्यानी गल्यात असलेल्या साडेचार…

  • मंदार पत्की यवतमाळ चे सीईओ !

    मुंबई- राज्य शासनाने 17 आयएएस आणि 43 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.यात बीडचे सुपुत्र मंदार पत्की यांना यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे,बीडचे पूर्वीचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची कोल्हापूर येथून बदली झाली असून अमोल येडगे यांना कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. नितीन पाटील (IAS:MH:2007) विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र,…

  • अशोक सराफ महाराष्ट्र भूषण !

    मुंबई- नाटक,हिंदी, मराठी चित्रपट यामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे चतुरस्त्र अभिनेते,मराठी चित्रपट सृष्टीचे मामा अर्थात अशोक सराफ यांना यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक दशक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे….

  • बोअरवेल मशिनवरील दोन कामगारांचा मृत्यू !

    परळी- गावात बोअर घेऊन परत निघालेल्या मशीन मधील लोखंडी पाईप चा स्पर्श विद्युत ताराना झाल्याने शॉक लागून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना परळी तालुक्यातील वाघबेट या गावात घडली. वाघबेट येथे बोअर घेण्यासाठी मशीन मागविण्यात आले होते. काम संपल्यानंतर ही मशीन घेऊन चालक आणि कामगार परत निघाले.गावातून जाणाऱ्या 11 केव्ही विद्युत भारवाहक ताराना या…

  • लोकसभेपुर्वी राज्यसभेचा आखाडा !

    नवी दिल्ली- महाराष्ट्रासह गुजरात,उत्तरप्रदेश, बिहार अशा पंधरा राज्यातील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.27 फेब्रुवारी रोजी मतदान आणि निकाल जाहीर होईल.या निवडणुकीनंतर भाजपचे राज्यसभेत बहुमत होईल. १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज सोमवारी केली. यासाठी ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी…

  • नितीशकुमार भाजपसोबत !सम्राट चौधरी, विजय सिन्हा होणार उपमुख्यमंत्री !

    पटना- बिहारमधील जेडीयु आणि आरजेडी चे सरकार मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजीनाम्यानंतर कोसळले.सकाळी अकरा वाजता नितीशकुमार यांनी राजीनामा राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द केला.भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला असून मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नितीशकुमार होणार असून भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे दोघे उपमुख्यमंत्री होणार आहेत. बिहारमध्ये गेल्या काही दिवसापासून सत्तेत असलेल्या जेडीयु आणि आरजेडी यांच्यात संघर्ष…

  • दिलेला शब्द मी पाळला- मुख्यमंत्री शिंदे !

    मुंबई- मी शब्द पाळणारा माणूस आहे,छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन आरक्षण देणारच अस सांगितले होते ते आज पूर्ण झाले.हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे,मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत अस सांगत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण प्रश्न निकाली निघाल्याची घोषणा केली. आजचा दिवस आनंदाचा,विजयाचा दिवस आहे,गुलाल उधळण्याचा दिवस आहे,मी तुमच्या प्रेमापोटी येथे…