News & View

ताज्या घडामोडी

नितीशकुमार भाजपसोबत !सम्राट चौधरी, विजय सिन्हा होणार उपमुख्यमंत्री !

पटना- बिहारमधील जेडीयु आणि आरजेडी चे सरकार मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजीनाम्यानंतर कोसळले.सकाळी अकरा वाजता नितीशकुमार यांनी राजीनामा राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द केला.भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला असून मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नितीशकुमार होणार असून भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे दोघे उपमुख्यमंत्री होणार आहेत.

बिहारमध्ये गेल्या काही दिवसापासून सत्तेत असलेल्या जेडीयु आणि आरजेडी यांच्यात संघर्ष सुरू होता.2020मध्ये भाजपसोबत मुख्यमंत्री झालेल्या नितीशकुमार यांनी 2022 मध्ये युती तोडत आरजेडी सोबत सत्ता स्थापन केली.वर्षभरातच आरजेडी चा हात सोडत पुन्हा नितीशकुमार भाजपसोबत आले आहेत.

२००० मध्ये नितीशकुमार भाजपला सोबत घेऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. मात्र बहुमताअभावी त्यांना ७ दिवसांतच राजीनामा द्यावा लागला होता. २००५ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा भाजपसोबतच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २०१० मध्ये नितीशकुमार मुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील मोदी उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर ते १४ वर्षे भाजपसोबत राहिले. २०१४ मध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित केल्यामुळे नाराज झालेल्या नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडली. मात्र, त्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्री केले

२०१५ मध्ये ते महागठबंधनमध्ये गेले आणि मुख्यमंत्री झाले. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले. २०१७ मध्ये त्यांनी महागठबंधन सोडून भाजपसोबत घरोबा केला. २०२०ची निवडणूक भाजपसोबत लढून ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा महागठबंधनसोबत गेले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *