News & View

ताज्या घडामोडी

लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न !

नवी दिल्ली- भारताचे माजी उपपंतप्रधान तथा भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान जाहीर झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.स्वातंत्र्य प्राप्ती पासून ते आजपर्यंत म्हणजेच पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ सक्रिय राजकारणात सहभाग असलेल्या अडवाणी यांना हा बहुमान मिळाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

लालकृष्ण अडवाणी हे  इ.स. १९७७ ते इ.स. १९७९ या काळात भारताचे माहिती आणि प्रसारणमंत्री तर इ.स. १९९८ ते इ.स. २००४ या काळात भारताचे गृहमंत्री होते. तसेच ते इ.स. २००२ ते इ.स. २००४ या काळात भारताचे उपपंतप्रधान होते.ते इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकींमध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 

इ.स. १९९१च्या निवडणुकींमध्ये त्यांनी गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातूनही विजय मिळवला होता.त्यामुळे त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघाच्या खासदारपदाचा राजीनामा दिला. जैन हवाला प्रकरणात त्यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल झाल्यामुळे त्यांनी इ.स. १९९६ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. त्यानंतर ते इ.स. १९९८इ.स. १९९९इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या निवडणुकींमध्ये गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.ते इ.स. १९९० ते इ.स. १९९३ दरम्यान आणि इ.स. २००४ पासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.

अडवाणी हे  इ.स. १९८६ ते इ.स. १९९०इ.स. १९९३ ते इ.स. १९९८ आणि इ.स. २००४ ते इ.स. २००५ या काळात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *