News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beed

  • पुढील पंचवीस वर्षाचे आपले नियोजन – मोदी !

    नवी दिल्ली- पुढील पाच वर्षासाठी नव्हे तर माझ्याकडे 25 वर्षासाठीचे नियोजन आहे,2047 साली भारत हा विकसित राष्ट्र असेल त्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ईडी,इलेक्ट्रोल बॉण्ड या सर्व आरोपांवर मोदी यांनी उत्तर दिले. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी गेल्या दहा वर्षातील कार्यकाळ आणि पुढील 25 वर्षाचे…

  • अवकाळीच्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी !

    तातडीने पंचनामे करण्याचे कृषिमंत्री मुंडेंचे आदेश ! धारूर – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला ब्रेक देत पडत्या पावसात धारूर तालुक्यातील चोरंबा, सोनीमोहा, आंबेवडगाव आदी गावांना भेटी देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या आंबा, डाळिंब, मिरची, टोमॅटो आदी पिकांची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांना धीर दिला. अवकाळीने फळांची व भाज्यांची पडझड झाली असून मोठ्या…

  • अवकाळी पाऊस ,गारपिटीने शेतकरी उध्वस्त !तातडीने पंचनामे करण्याचे आदेश !!

    बीड -जिल्ह्यात विविध भागात गुरुवारी दुपारी वादळीवार्‍यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला तर धारुर, वडवणी व गेवराई तालुक्यात गारा बसरल्या. यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दरम्यान गुरुवारी झालेल्या गारपीटीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून मदत आचारसंहिता संपल्यावर मिळेल अशी माहिती कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सकाळच्या सत्रामध्ये अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण…

  • जालन्यात डॉ कल्याण काळे !

    मुंबई- काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील जालना आणि धुळे मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत. जालन्यात माजी आ कल्याण काळे यांना तर धुळे मधून शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने आपली चौथी यादी जाहीर केली,ज्यामध्ये महाराष्ट्रातून धुळे आणि जालना येथील उमेदवारांची घोषणा केली आहे.छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील माजी आ डॉ कल्याण…

  • राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा !

    मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगत त्यांनी मी कोणत्याही दुसऱ्या पक्षाचा प्रमुख होणार नाही,कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागावे असे आदेशही ठाकरे यांनी दिले. मनसे चा गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर पार पडला.त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की,मी काही…

  • बीडमधून अशोक हिंगेना वंचितची उमेदवारी !

    मुंबई- बीड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.शिवसंग्राम च्या प्रमुख ज्योती मेटे यांना देखील विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यांनी नकार दिल्याने हिंगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बीड लोकसभा निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली…

  • आ सोळंकेच्या पीए ला भररस्त्यात बदडले !

    माजलगाव- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादेव सोळंके यांना रस्त्यावर बेदम चोप दिल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षण प्रकरणावरून आ सोळंके यांच्या घरी झालेल्या जाळपोळ प्रकरणी आपले नाव का घेतले म्हणून सोळंके यांना मारहाण झाली. नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकरणावरून वादात सापडणारे आ सोळंके यांचे पीए महादेव…

  • 8 जूनला नारायणगड येथे मराठ्यांची सभा !

    बीड- मराठा आरक्षणाच्या विषयावर बीड तालुक्यातील नारायणगड येथे 8 जून रोजी 900 एकर मध्ये सभा होणार आहे.याबाबत आयोजित नियोजन बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी आचारसंहिता संपल्यावर सगेसोयरे कायदा लागू करा अन्यथा परिणामांना सामोरे जा असा इशारा दिला. बीडच्या श्रीक्षेत्र नगद नारायण गड इथं मराठा समाज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी एक विराट संख्येने एकवटणार आहे. 8…

  • अखेर ठरलं !बजरंग सोनवणे बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार !

    मुंबई- गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून संपूर्ण बीड जिल्हा वाशी यांचे लक्ष ज्या गोष्टीकडे लागले होते त्यावर पडदा पडला आहे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून लोकसभेसाठीचे उमेदवार असतील याबाबतची घोषणा शरद पवार गटाकडून करण्यात आली त्यामुळे आता पवार विरुद्ध मुंडे हा सामना बजरंग…

  • बीडच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाला बेड्या !

    बीड- शहरातील सम्राट चौक भागात राहणाऱ्या आणि धुळे येथे स्थानिक गुन्हे शाखेत नोकरीस असलेल्या पोलीस निरीक्षक दत्ता शिंदे यांच्यासह तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.शिंदे यांच्या घराची झडती घेतली असता करोडो रुपयांची मालमत्ता आढळून आली. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 35 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, ते राजकीय व सामाजिक कार्यकर्ता आहेत. राजकीय सहकार्‍यांशी मतभेद झाल्याने त्यांच्याविरोधात…