News & View

ताज्या घडामोडी

8 जूनला नारायणगड येथे मराठ्यांची सभा !

बीड- मराठा आरक्षणाच्या विषयावर बीड तालुक्यातील नारायणगड येथे 8 जून रोजी 900 एकर मध्ये सभा होणार आहे.याबाबत आयोजित नियोजन बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी आचारसंहिता संपल्यावर सगेसोयरे कायदा लागू करा अन्यथा परिणामांना सामोरे जा असा इशारा दिला.

बीडच्या श्रीक्षेत्र नगद नारायण गड इथं मराठा समाज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी एक विराट संख्येने एकवटणार आहे. 8 जून रोजी ऐतिहासिक सभा होणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये केली आहे. तसंच या सभेच्या नियोजनाच्या तयारीला लागा असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केला आहे.

न्यूज अँड व्युजच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा !

मराठा आरक्षणासाठी सरकारकडे पुन्हा एकदा मागणी करणार आहोत. राज्य सरकारने जे आरक्षण दिलं ते आम्हाला मान्य नाही. आता आरक्षणासाठी राज्यातील सहा कोटी मराठा समाज एकत्रित येणार आहे. त्यामुळे सरकारने हलक्यात घेऊ नये, सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आचारसंहिता संपताच काढावा अन्यथा मराठा समाजाच्या रोशाला सामोरे जावं लागेल, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आज शुक्रवारी बीडचा श्रीक्षेत नगद नारायण गड इथं सभेच्या अनुषंगाने प्राथमिक बैठक संपन्न झाली. या बैठकीत सभेचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था रस्ते पाणी आणि व्यासपीठासंदर्भात देखील चर्चा झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *