Category: बीड
-

बीडमध्ये दगडफेक ! सुभाष रोड सह अनेक भाग बंद !
बीड- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीड शहरांमध्ये दुपारच्या सुमारास अचानक आंदोलकांनी दगडफेक केल्यामुळे अनेक भाग बंद झाले आहे सुभाष रोड बोंडा जालना रोड या भागात शेकडो आंदोलन रस्त्यावर येऊन त्यांनी घोषणाबाजी करत दगडफेक केल्यामुळे बाजारपेठ तातडीने बंद झाली शहरात वातावरण तणावपूर्ण बनलेले असताना पोलीस मात्र रस्त्यावर नसल्याचे चित्र दिसून आले मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठवाड्यासह महाराष्ट्रात गाजत…
-

आ सोळंके यांच्या शाळा महाविद्यालयावर दगडफेक ! नगर परिषद इमारतीला लावली आग !!
बीड- शांततेत सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन उग्र झाले आहे.मनोज जरांगे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून आग लावल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या शाळा ,महाविद्यालयात जाऊन दगडफेक करत तोडफोड केली. नगर परिषद कार्यालयाला देखील आग लावण्यात आली. आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठवाड्यात आंदोलन उग्र स्वरूप घेत आहे.जरांगे पाटील यांनी शांततेचे आवाहन केले असले…
-

गडाच्या महंतांचे आशीर्वाद अन मल्टिस्टेट ची भरभराट !
बीड- तुम्ही मेहनतीने कमावलेला पैसा जेवढा राष्ट्रीयीकृत बँकेत सुरक्षित आहे तेवढा कुठेच नाही,मात्र तरीही हजारो,लाखो लोक मल्टिस्टेट, पतसंस्था आणि अर्बन निधी च्या नादी लागून वाटोळे करून घेतात.या मल्टिस्टेट वाल्यानी एक नवा फंडा शोधला आहे.जिल्ह्यातील देवस्थान, गड यांच्या महाराजांना हाताशी धरायचे अन कोट्यवधी रुपयांचा धंदा करायचा असा उद्योग बीडमध्ये जोरात सुरु आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाने…
-

कँडल मार्चसाठी हजारो मराठा रस्त्यावर !
बीड- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बीडमध्ये हजारो मराठा बांधव कँडल हातात घेऊन रस्त्यावर उतरले. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, आरक्षण देत कस नाही,घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देत बीडमध्ये हजरो मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर…
-

राज्यातील कृषी विक्रेत्यांचा तीन दिवस बंद !
बीड- नवीन कृषी कायद्याला कृषी विक्रेत्यांनी विरोध दर्शविला असून येत्या 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील सर्व कृषी विक्रेत्यांनी बंद चे आवाहन केले आहे.कृषी कायद्यातील जाचक तरतुरी रद्द करण्याची मागणी विक्रेत्यांनी केली आहे महाराष्ट्र शासनाच्या नवीन प्रस्तावित कृषी कायदा विधेयक क्र ४०.४१,४२,४३ व ४४ मधील कृषी हिताल बाधा आणणाऱ्या जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित…
-

मल्टिस्टेट नव्हे हे तर हवाला सेंटर ! ठेवीदारांच्या पैशावर मालकांची प्रॉपर्टी !!
बीड- बीड शहर किंवा तालुक्यातील अथवा जिल्ह्यातील जेवढ्या पतसंस्था किंवा मल्टिस्टेट आहेत ज्यांच्या अनेक शहरात,जिल्ह्यात शाखा आहेत त्यांचा व्यवहार हवाला सारखा आहे.बेकायदेशीर पणे एका शहरातून दुसऱ्या शहरात पैसे पोहचवण्याचा उद्योग हे लोक करतात .हजारो ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या पैशावर मालक पुणे,मुंबई पासून दुबई पर्यंत प्रॉपर्टी घेत आहेत अन ठेवीदार मात्र पैशाची वाट पहात आहेत. बीड जिल्ह्यात…
-

मुख्याधिकारी गुट्टे प्रकरणाची चौकशी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश !
बीड- बदली होऊन पदभार सोडल्यानंतर बीड शहरातील सर्व्हे नंबर 35 मधील जागेचे बोगस कागदपत्रांच्या आधारावर ले आउट मंजूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश झालेल्या मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे प्रकरणात चौकशी करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली. बीड शहरातील नाट्यगृहासमोर असलेल्या बागलाने इस्टेट येथील 15650 चौरस मीटर क्षेत्रावर अभिण्यास मंजूर केल्या प्रकरणात शासनाने…
-

मल्टिस्टेट च्या माध्यमातून मनी लोन्ड्रीग ! गड,देवस्थानच्या पैशावर मालकांचा डल्ला !!
बीड- बीड शहरातील अनेक मल्टिस्टेट अन पतसंस्था म्हणजे सरकारच्या लायसन वर सुरू असलेली खाजगी सावकारकी असल्याचे समोर आले आहे.मात्र त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने हे मल्टिस्टेट अन पतसंस्थेचे मालक मोकाट झाले आहेत.कोट्यवधी रुपयांच्या ठेवी हाताशी असल्याने यांचे इतर उद्योग फोफावले आहेत.या माध्यमातून मनी लोन्ड्रीग होत असल्याच्या तक्रारी केंद्रीय सहकार विभागाकडे झाल्या असल्याने ठेवीदार हैराण झाले आहेत.बहुतांश…
-

दोन अपघातात दहा ठार ! सागर ट्रॅव्हल्स उलटली !!
आष्टी- ट्रकला पाठीमागून जाणाऱ्या रुगवाहिकेने जोराची धडक दिल्याने चार जण तर सागर ट्रॅव्हल्स उलटल्याने सहा जण ठार झाल्याची घटना आष्टी नगर हद्दीवर घडली.अपघाताची माहिती मिळताच आ सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेतली. आष्टी तालुक्यातील धामणगावकडून अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला दौलावडगाव जवळ वळण घेत असताना नगरकडे रूग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली….
-

पालकमंत्री मुंडेंचा पाठपुरावा, अग्रीम न देण्याचे कंपनीचे अपील फेटाळले !
मुंबई -बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण आग्रही भूमिकेला यश येताना दिसत असून, बीड जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांमध्ये अग्रीम न देण्याचे पीक विमा कंपनीचे अपील आज राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळून लावली आहे. बीड जिल्ह्यात सुरुवातीला व मध्य खरिपात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनसह विविध खरीप पिके संकटात…


