Category: बीड
-
नारायणगड हे भगवानगडाचे गुरुघर -महंत नामदेवशास्त्री!
बीड -नारायणगड हे भगवानगडाचे गुरुघर आहे. 90 वर्षांपूर्वी भगवान बाबांनी नारळी साप्ताहची सुरवात केली. आज पिंपळनेर येथे 91 वा सप्ताह होतो आहे याचा आनंद आहे. भगवान बाबा वामनभाऊ यांनी डोंगरातील माणसांना माळ घालून माणसात आणलं आज काहीजण माळकऱ्यांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे सांगत महंत नामदेव शास्त्री यांनी नारळी सप्ताहाचा प्रारंभ केला. शिरूर…
-
आपण निर्दोष -वाल्मिकचा न्यायालयात दावा!
बीड -संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपण निर्दोष आहोत, माझा या प्रकारणांशी काहीही संबंध नाही असा अर्ज आरोपी वाल्मिक कराड याने केला आहे. यावर्षी पुढील सुनावणीत सीआयडी ने आपले म्हणणे मांडावे असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सुनावणी पार पडल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आरोपी क्रमांक एक वाल्मिक कराडने…
-
माफियांना मातीत घालणार!कोणाच्याही पाया पडू नका -अजित पवार!
बीड -वाळू माफिया, रेती माफिया, भूखंड माफिया यांना मातीत घातल्याशिवाय शांत बसणार नाही असा ईशारा देतानाच कोणाच्याही पाया पडू नका, पाया पडण्यासारखे लोक राहिले नाहीत असा म्हणत उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. बीडच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्यगृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. बीडमध्ये वाळू…
-
सिंदफणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांना मान्यता!
बीड -जिल्ह्यातील शिरूर आणि गेवराई तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या सिंदफना नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील ब्रम्हनाथ येळंब कोल्हापूर पध्दतीच्या बंधारे प्रकल्पाचे बॅरेजमध्ये रुपांतरीत करण्याच्या कामास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवर सुमारे 30 ते 35 वर्षापूर्वी…
-
वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण!
बीड -संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना बीडच्या कारागृहात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. सरपंच हत्या प्रकरणात अटक असलेल्या परळीमधील आरोपींमध्ये हा वाद झाल्याची जेल प्रशासनाने पुष्टी केली आहे. दोन गटांमध्ये हा वाद झाला आहे. कोणते दोन गट आहेत? अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. याच कारागृहात संतोष…
-
ईदच्या पूर्वसंध्येला गेवराईत मस्जिदमध्ये स्फोट!
गेवराई -उरूस मिरवणुकीत झालेल्या वादानंतर गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मस्जिद मध्ये जिलेटिन च्या सहाय्याने स्फोट घडवण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे. हा स्फोट नेमका का घडवला, याचं कारणही पोलिसांनी शोधून काढलं आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी याबाबतची माहिती…
-
नववर्षाच्या स्वागताला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जीवनपट उलगडणार संस्कार भारती!
बीड – तब्बल 28 वर्षाची परंपरा लाभलेल्या कनकालेश्वर महोस्तवात यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावरील नाटिका सादर केली जाणार आहे. नृत्य, नाटक,गवळण गायन आणि पखवाज वादनाने यावर्षी मराठी नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे अशी माहिती संस्कार भारती बीडच्या संयोजकांनी दिली आहे. संस्कार भारती बीड शाखेच्या वतीने गेल्या 28 वर्षांपासून कनकालेश्वर महोत्सव साजरा केला जातो चैत्रशुद्ध…
-
गेवराईच्या छत्रपती मल्टीस्टेट कडून फसवणूक!
बीड -दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आणि राज्याच्या कानकोपऱ्यात शाखांचे जाळे उभारून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी गोळा केलेल्या छत्रपती मल्टीस्टेट कडून ग्राहकांची फसवणूक झाली आहे. याबाबत अनेक ग्राहकांनी बीड आणि गेवराई च्या न्यायालयात धाव घेतली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. बीड जिल्ह्यात गेल्या वर्ष दीड वर्षांपासून जिजाऊ मा साहेब, ज्ञानराधा, साईराम सारख्या अनेक मल्टीस्टेट, पतसंस्था बंद पडल्या….
-
देशमुख मर्डरच्या सुनावणीत उज्वल निकम यांचा खळबळजनक दावा!
बीड -स्व संतोष देशमुख यांच्या खून खटल्यात जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांच्या दाव्याने खळबळ उडाली. फरार आरोपी कृष्णा आंधळे याने विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याशी तीनवेळा फोनवर संपर्क साधला. फिर्यादी पक्षांकडे आरोपीचे सीडीआर असून त्यातून अनेक गोष्टी समोर येतील असे निकम म्हणाले. बीड मकोका न्यायालयात झालेल्या या सुनावणीत उज्ज्वल निकम यांनी एक महत्त्वाचा पुरावा…
-
डॉ थोरात यांचे निलंबन!
मुंबई -बीडचे जिल्हा शल्य चिकित्स्क डॉ अशोक थोरात यांचे विधानसभेत निलम्बन करण्यात आले. केजच्या आ नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ही कारवाई झाली. कोविड मधील घोटाळा याला जबाबदार असल्याचे सांगितलं जात असलं तरी विधानसभा निवडणुकीत डॉ थोरात यांनी केलेला विरोध हे मुख्य कारण असल्याची चर्चा आहे. बीड जिल्हा रुग्णालयात आपल्या कामाच्या जोरावर आणि शिस्तीच्या…