Category: बीड
-
नागपूर प्रमाणेच संभाजीनगर विभागात शेकडो बोगस शिक्षक भरती!
बीड -नागपूर मध्ये ज्या पद्धतीने बोगस शालार्थ आय डी तयार करून शेकडो बोगस शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती करण्यात आली. त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगर विभागात देखील बोगस शालार्थ आय डी तयार करून 2019 ते 2024 या काळात शेकडो बोगस शिक्षक आणि कर्मचारी यांची भरती करण्यात आली. त्यामुळे संभाजीनगर येथील उपसंचालक आणि सर्व अधीक्षक तसेच…
-
थकीत वेतनाच्या कोट्यावधी रुपयांमुळे संस्थाचालक मालामाल!
बीड -ज्या काळात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी होती त्या काळात बोगस भरती करून त्या शिक्षकांचे 2012 ते 2024 या काळातील थकीत वेतन काढण्याचा प्रकार बीडमध्ये झालाय. एका एका शाळेवरील किमान दहा पेक्षा जास्त शिक्षक व कर्मचारी यांचे कोट्यावधी रुपये संस्थाचालक यांनी घशात घातले आहेत. यामुळे नोकरीवर लागलेल्या शिक्षक आणि कर्मचारी यांच्यामध्ये नाराजीचा सुर…
-
बलभीम,केएसके, आदित्य मध्ये कॉप्यांचा महापूर!
बीड -पदव्युत्तर परीक्षामध्ये बीड जिल्ह्यात कॉप्यांचा महापूर सुरु असल्याचे धक्कादायक चित्र आढळून आले आहे.कुलगुरूनी केलेल्या पाहणीत बीडमधील बलभीम, केएसके आणि आदित्य महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात सामूहिक कॉपी सुरु असल्याचे आढळून आले. परीक्षा केंद्रावर असुविधा असल्याचे देखील निदर्शनास आले. या प्रकरणी कुलगुरूनी 36 विदयार्थ्यांवर कारवाई केली आहे. बीड येथील पदवी, पदव्युत्तर परीक्षांमध्ये कॉप्यांचे प्रकार होत असल्याबाबत चर्चा…
-
बड्या पार्टीमुळे सिनियर जेलर सस्पेंड!
बीड -जिल्हाधिकारी कारागृहात असलेल्या एका बड्या पार्टीच्या कुटाण्यामुळे एक सिनियर जेलर वर सस्पेंड होण्याची वेळ आली. वरिष्ठ कार्यालयाच्या चौकशी मध्ये बीडच्या जेलमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याने या सिनियर वर ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यभरातील कोणत्याही जेलमध्ये कैद्याना रोज वापरात येणारे काही सामान खरेदी करण्यासाठी कँटीन ची व्यवस्था करण्यात आलेली…
-
विवेक जॉन्सन यांनी स्वीकारला पदभार!
बीड- बीड जिल्हयाचे जिल्हाधिकारी म्हणून विवेक जान्सन यांनी आज पदभार स्विकारला. श्री. जॉन्सन 2018 च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. येथे बदलून येण्यापूर्वी ते चंद्रपूर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. अभियंता पदवी नंतर ते प्रशासकीय सेवेत आहेत. त्यांनी परिविक्षाधिन कालावधीत येथील माजलगाव नगर परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केलेले आहे.त्यांनी पदभार…
-
अवघ्या दहा महिन्यात जिल्हाधिकारी पाठक यांची बदली!
विवेक जॉन्सन नवे जिल्हाधिकारी! बीड -लोकसभा निवडणुकीनंतर बीडमध्ये रुजू झालेले जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची अचानक बदली करण्यात आली आहे. अवघ्या दहा महिन्यात पाठक यांची बदली झाली असून नवे जिल्हाधिकारी म्हणून विवेक जॉन्सन हे रुजू होणार आहेत. बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक हे जुन 2024 मध्ये रुजू झाले होते. त्याआगोदर त्यांनी वर्षभर बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी…
-
जिल्ह्याला मिळाले दोन अप्पर जिल्हाधिकारी!
बीड -गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी पदावर हरीश धार्मिक यांची तर अंबाजोगाई च्या अप्पर जिल्हाधिकारी पदावर अश्विनी सोनवणे जिरंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील बीड आणि अंबाजोगाई येथील दोन्ही अप्पर जिल्हाधिकारी यांची पदे गेल्या काही महिन्यापासून रिक्त होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील पदांचा अनुशेष भरून…
-
नागपूर घोटाळ्यानंतर शिक्षण विभागाला खडबडून जाग!
शिक्षकांचे पोस्ट मॅपिंग सुरु!राज्यभरात हजारो बोगस शिक्षक!! बीड -नागपूर बोगस शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे राज्यभरातील शिक्षकांचे पोस्ट मॅपिंग सुरु करण्यात आले आहे. यामध्ये तब्बल अकरा हजारापेक्षा जास्तच शिक्षक बोगस भरती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्यभरातील शिक्षकांचे धाबे दनानले आहेत. नागपूर विभागातील घोटाळा चव्हाट्यावर येताच शिक्षण…
-
कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
बीड – वादग्रस्त व सध्या सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याचे परळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व्हिडिओ द्वारे प्रसारित केलेले आरोप खोटारडे, जनतेची दिशाभूल करणारे तसेच निवडणूक आयोगावर शंका उपस्थित करणारे असून त्यात कोणतेही तथ्य नाही; रणजित कासले याला संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत, स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षित, ईव्हीएम मशीन सुरक्षा किंवा मतमोजणी प्रक्रिया यापैकी कुठेही…
-
पोलीस पाटलांची भरती सुरु!
बीड – बीड जिल्ह्यातील ११२२ पोलीस पाटील रिक्त पदांची भरती त्वरित करावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री बावनकुळे यांचेकडे केली होती या मागणीची दखल घेऊन मा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी उपविभागीय अधिकारी यांना भरती बाबत आदेश दिले आहेत. बीड जिल्ह्यात कोरोना काळापासून आजपर्यंत जवळपास 85 टक्के गावांमध्ये पोलीस…