Category: बीड
-
थर्मल च्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस मान्यता!
धनंजय मुंडेंच्या मागणीस अजित पवारांचा ग्रीन सिग्नल! परळी – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या परळी दौऱ्यात धनंजय मुंडे यांच्या एका महत्त्वाच्या मागणीला यश आले आहे. परळी येथील जुन्या औष्णिक विद्युत केंद्राच्या जागेत बंद असलेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत नवीन मेगा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे यासह नवीन थर्मल मध्ये प्रस्तावित संच क्रमांक…
-
गुळभीले दांपत्याचा आदर्श निर्णय!
बीड -राष्ट्र्पती पुरस्कार प्राप्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत गुळभीले आणि त्यांच्या पत्नी नीता गुळभीले या दोघा पती पत्नीने आपला एक महिन्याचा पगार पंतप्रधान रिलीफ फंडासाठी देत एक आदर्श निर्माण केला आहे. ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून प्रेरणा घेत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली गुळभीले दांपत्याने हा निर्णय घेतल्याने त्यांचे कौतुक होतं आहे. मागील आठवड्यात भारत पाकिस्तान…
-
फुलारीनी मोठा डाव हाणला!टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना दिल्या नियुक्त्या!
बीड -सन 2021 मधील घोटाळ्यातील शिक्षकांना चौकशी करून वेतनवाढ व कायम घेण्याबाबत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र 8 मे 2025 रोजी उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर तात्काळ 13 मे 2025 रोजी सदर शिक्षकांना कोणत्याही प्रकारची शहनिशा अथवा चौकशी न करता पूर्वलक्षी प्रभावाने लाभ देऊन सेवेत सामावून घेण्यातचे आदेश दिले आहेत. टीएटी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या…
-
बोगस शिक्षक भरती करणाऱ्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल?
बीड -नागपूर येथील शिक्षक भरती प्रकरणात ज्या ज्या शाळांचा समावेश आहे, त्या त्या संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रकरणाचा तपास लवकरच एस आय टी कडे जाणार असून त्यानंतर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या सगळ्यानंतर मराठवाडा आणि विशेषतः बीड जिल्ह्यातील संस्थाचालकांवर देखील गंडातर येणार आहे. २०१४ पासून ज्या शाळांनी शिक्षकांच्या…
-
बोगसगिरी खपवून घेणार नाही -आ क्षीरसागर!
बोगस कामांचा आ क्षीरसागरांकडून पर्दाफाश! बीड – बीड विधानसभा मतदारसंघात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच नरेगाच्या अंतर्गत अनेक निकृष्ट दर्जाची आणि बोगस कामे झाली आहेत. शासकीय अधिकारी यांच्याशी संगनमत करून अनेकांनी यामध्ये मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. या सर्व प्रकरणांचे आता आ.संदीप क्षीरसागर यांनी पोस्टमार्टम करायला सुरुवात केली आहे, म्हणजेच झालेल्या कामांची स्वतः…
-
पाण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा नगर परिषदेवर मोर्चा!
बीड -राज्यात सत्तेत असलेल्या आणि ज्यांच्या हाती अर्थ खात्याच्या चाव्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपच्या वतीने आज पाण्यासाठी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा काढणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जर आपल्या नेत्याकडे वीज जोडणीसाठीचे पैसे मागितले असते तर आजपर्यंत दररोज बीड वासियांना पाणी मिळाले असते अशी चर्चा या मोर्चा नंतर सुरु झाली आहे….
-
शहर स्वछतेबाबत आ क्षीरसागर यांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक!
बीड – पावसाळ्याच्या पूर्वी शहरातील नालेसफाई, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन करणे तसेच बीड नगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी चतुर्थ कर आकारणी (टॅक्स रिव्हीजन) करण्यासाठी सुव्यवस्थित करणे तसेच बीड शहरातील नगर रोडवर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना नगर नाका यांमध्ये रस्ता क्रॉसिंग अशा विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी बुधवारी (दि.७) रोजी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली….
-
दोन पोलिसांवर बडतर्फीची कारवाई!
बीड -पोलीस अधीक्षक यांच्या शासकीय निवासस्थानी गांजा ओढणारा आणि वाळू तस्कराला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे. बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यापासून नवनीत कावत यांनी पोलीस दलात शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. पोलीस दलावर आरोप करणारा पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले असो कि इतर…
-
सिओ वर टीका, गेंड्याला आला राग!
बीड -नगर पालीकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे या गेंड्याच्या कातडीच्या आहेत कि काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बीड शहर वासियांना महिना महिना पाणी मिळतं नाहीये, शहरात सगळीकडे कचऱ्याचे ढीग साचले आहेत, कोट्यावधी रुपयांची बोगस बिल उचलली जातं आहेत, तरीही नीता अंधारे यांना काहीच कसं वाटतं नाही असं म्हणत पेपरवाल्यानी त्या गेंड्याच्या कातडीच्या आहेत अशा बातम्या…
-
दोन महिन्यापासून पाणी पुरवठ्यासाठी आ क्षीरसागर यांनी काय धडपड केली ते एकदा प्रत्येकाने जाऊन पाहायलाच हवे!
दोन दिवसानंतर आठवड्यातून एकदा मिळणार पाणी! बीड -तीन साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या बीड शहराला महिन्यातून एकवेळ पाणी पुरवठा होतो आहे. याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी, प्रशासन कि सरकार यावरून बीड शहर वासीय कन्फ्यूज आहेत. माजलगाव आणि बिंदूसरा धरणात मुबलक पाणी उपलब्ध असताना सुद्धा महिन्याला पाणी मिळणे मुश्किल का झाले आहे आणि लोकप्रतिनिधी काहीच करत नाहीत का…