Category: महाराष्ट्र
-
जरांगे ठाकरे पवारांची भाषा बोलू लागले-मुख्यमंत्री !
मुंबई- कायदा हातात घेण्याचा आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल शिवराळ भाषा कोणी वापरत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही,असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.मनोज जरांगे हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भाषा बोलत आहेत असा आरोप देखील शिंदे यांनी केला. सगेसोयरे मुद्यावरून सोळा दिवसापासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी आयोजित…
-
जरांगेचे फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप!थेट मुंबईकडे कूच !!
अंतरवली सराटी- गेल्या पंधरा दिवसापेक्षा जास्त काळापासून सगेसोयरे अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील हे रविवारी चांगलेच संतापले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत ते थेट मुंबईकडे निघाले आहेत.त्यांना समजावून सांगण्यासाठी मराठा बांधव सोबत आहेत. सराटी येथे बोलताना मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला.ते म्हणाले की,मराठ्यांचा राज्यावर पुन्हा एकदा दरारा निर्णय झाला आहे….
-
महासंस्कृती महोत्सवाकडे बीड करांनी फिरवली पाठ !
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवर गैरहजर ! बीड- कोट्यवधी रुपये खर्च करून आयोजित केलेल्या बीड येथील महासंस्कृती महोत्सवाकडे बीडकरांनी पाठ फिरवली.उद्घाटक म्हणून आमंत्रित असलेले पालकमंत्री तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे हे देखील कार्यक्रमाला गैरहजर होते.विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन उरकण्यात आले. राज्य शासनाच्या कृषी,महिला बाल कल्याण आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने बीड येथे…
-
दुष्काळी बीड जिल्ह्यात महा सांस्कृतिक वर करोडोंची उधळपट्टी !
बीड-महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेल्या बीड जिल्ह्यात शासन आणि प्रशासनाच्या वतीने मनोरंजनाच्या कार्यक्रमावर किमान दोन ते पाच कोटी रुपयांचा चुराडा केला जाणार आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासनातील अधिकाऱ्यांची देखील चांदी होणार आहे हे निश्चित. कायम दुष्काळ पाचवीला पूजलेल्या बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्या च्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.राज्याचे कृषिमंत्री हे बीड जिल्ह्यातील असले…
-
मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण !
मुंबई- मराठा समाजाला स्वतंत्र रित्या दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय विधानसभेने एकमताने मंजूर केला.मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशनात हा ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला जो सभागृहाने एकमताने मंजूर केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या विषयावर बोलताना म्हणाले की,मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, मी शब्द पाळतो. त्यामुळे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. मी मागचा विषय…
-
बीडकरांनी अनुभवला शिवजयंती चा उत्साह !
बीड – चित्तथराक प्रात्यक्षिक, शिवकालीन मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, महाराषट्रातील विविध भागातील ढोल पथक, केरळ ची पुरातन युद्धकला, आंतराष्ट्रीय दर्जाच्या लेजर-शो च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी जीवनपट बिडकरांच्या डोळ्यासमोर उभा राहिला.आ संदिप क्षीरसागर यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सर्वस्व असल्याचे मत व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे बीडकरांना शिवजयंती च्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली….
-
राष्ट्रवादी चे सर्व आमदार पात्र !
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व आमदार पात्र असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.हा निकाल देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिल्याचा उल्लेख करत अध्यक्षांनी हा निकाल दिला. विधिमंडळात असलेले बहुमत याच्या आधारे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नार्वेकर देखील याचा आधार…
-
नाली साफ करताना जेसीबीच्या खोऱ्यात बाहेर आला मृतदेह !
बीड- शहरातील सुभाष रोड,माळीवेस भागात नाल्यांची साफसफाई सुरू असताना जेसीबीच्या खोऱ्यात चक्क मानवी मृतदेह आल्याने खळबळ उडाली.पोलिस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे. बीड नगर पालिकेच्या माध्यमातून शहरातील नाल्यांची स्वच्छता मोहीम सध्या सुरू आहे.बीड शहरातील सुभाष रोडवर असलेल्या नेहरू नगर च्या मोठ्या नाल्याची जेसीबी मार्फत साफसफाई सुरू होती. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या खोऱ्यात…
-
अशोक चव्हाण,मेधा कुलकर्णी, अजित गोपच्छडे यांना भाजपची उमेदवारी !
मुंबई- राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तिघांना उमेदवारी जाहीर केली आहे.काँग्रेस मधून भाजपवासी झालेले अशोक चव्हाण, माजी आ मेधा कुलकर्णी आणि नांदेड चे अजित गोपच्छडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी देशभरातील 56 राज्यसभा उमेदवारासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र मधून 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यातील सत्ताधारी…
-
अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश !
मुंबई-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण आणि माजी आ अमरनाथ राजूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपमध्ये घाऊक प्रवेश सुरू झाले आहेत.काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या अनेकवेळा येत होत्या.अखेर त्यावर शिक्कामोर्तब…